प्रकट दिन २०२६: श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन कसे कराल? सोपा पूजा विधी अन् प्रभावी मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 10:33 IST2026-03-19T10:32:24+5:302026-03-19T10:33:57+5:30

Shree Swami Samarth Prakat Din 2026 Pujan: स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा.

prakat din 2026 how to do shri swami samarth maharaj puja know worship rituals and effective mantras | प्रकट दिन २०२६: श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन कसे कराल? सोपा पूजा विधी अन् प्रभावी मंत्र

प्रकट दिन २०२६: श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन कसे कराल? सोपा पूजा विधी अन् प्रभावी मंत्र

Shree Swami Samarth Prakat Din 2026 Pujan: श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन शुक्रवार २० मार्च २०२६ रोजी आहे. चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामींचा प्रकट दिन असतो. या दिवशी लाखो स्वामी भक्त स्वामींची सेवा करतात, अक्कलकोटला जातात किंवा स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. अनेकांना मठात जाणे शक्य होत नाही. परंतु, स्वामी सेवा करण्याची मनापासून इच्छा असते. अशा वेळी थोडा वेळ काढून घरी स्वामींचे पूजन करता येऊ शकेल. जाणून घेऊया...

 भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन शंभर वर्षांहून अधिक वर्षे उलटून गेला असला तरी त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. अशा स्वामी महाराजांची करावी तेवढी सेवा कमीच आहे, असे म्हटले जाते. 

प्रकट दिनी श्री स्वामी समर्थ पूजन विधी

- सर्वप्रथम सकाळी लवकर उठून नित्यकर्मे आटोपून शूचिर्भूत व्हावे. ज्या ठिकाणी पूजा करणार आहात, ती जागा स्वच्छ करून घ्यावी. एका चौरंगावर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. त्यानंतर स्वामी पूजनाचा संकल्प करावा. स्वामींचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे स्वामींना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करावी. 

- मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास स्वामींची स्तोत्रे, श्लोक, मंत्रांचे जप करावेत. यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार पूजन करावे. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी.

- विशेष म्हणजे स्वामींना आवडतील अशी फुले अर्पण करावीत. स्वामींच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. भक्तिभावाने स्वामींची पूजा करा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पिवळ्या रंगाचा समावेश असलेली फुले, गोडाचा पदार्थ, पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून स्वामींना अर्पण करावी. 

- किमान १०८ वेळा 'श्री स्वामी समर्थ' या मंत्राचा जप करावा. १०८ वेळा शक्य नसेल, तर शक्य आहे, तितका जप करावा. तसेच तारक मंत्र अवश्य म्हणावा.

- स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. 

- स्वामी महाराजांप्रति केवळ नम्र, शरणागत आणि समर्पण भाव ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. 

॥ श्री स्वामी समर्थ ॥

 
 

Web Title : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 2026: सरल पूजा और प्रभावी मंत्र

Web Summary : 20 मार्च 2026 को श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मनाएं, घर पर सरल पूजा करें। पंचामृत, फूल और मिठाई अर्पित करें। 'श्री स्वामी समर्थ' मंत्र का जाप करें और कल्याण के लिए स्वामी के आशीर्वाद में विश्वास रखें।

Web Title : Shree Swami Samarth Prakat Din 2026: Simple Puja and Effective Mantras

Web Summary : Celebrate Shree Swami Samarth Prakat Din on March 20, 2026, with simple home puja. Offer Panchamrit, flowers, and sweets. Chant 'Shree Swami Samarth' mantra and trust in Swami's blessings for well-being and fulfillment.