Pitru Paksha 2025: पितृपक्षात कावळ्यांबरोबरच माशांना खाऊ घातल्याने होणारे फायदे वाचून चकित व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 07:00 IST2025-09-16T07:00:00+5:302025-09-16T07:00:02+5:30
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कावळ्यांना जेवू घालण्याचा प्रघात आपल्याला माहीत आहेच, पण माशांना खाऊ घातल्याने होणारे फायदेही जाणून घ्या.

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कावळ्यांबरोबरच माशांना खाऊ घातल्याने होणारे फायदे वाचून चकित व्हाल!
सध्या पितृपक्ष(Pitru Paksha 2025) सुरू आहे. पितरांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून आपण तिथीनुसार श्राद्धविधी करतो. तसेच त्यांना आवडेल असा नैवेद्य अर्पण करतो. तसेच मुक्या प्राणिमात्रांना भोजन अर्पण करतो. पितर कोणत्या रूपाने येऊन आपल्याला आशीर्वाद देतील हे सांगता येत नाही. यासाठीच शास्त्रात वेगवेगळे पर्याय दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जलचरांना अन्न घालणे. पण ते कोणत्या स्वरूपात असायला हवे, ते पाहू.
१. माशांना कणकेचे छोटे गोळे खाऊ घातल्याने दीर्घ आजारातून मुक्ती मिळते.
२. माशांना कणिक खाऊ घातल्याने समृद्धी वाढते.
षडाष्टक योग २०२५: १८ सप्टेंबर शनी-शुक्र अशुभ षडाष्टक; ५ राशींचे आर्थिक, मानसिक आरोग्य धोक्यात
३. माशांना पीठ खायला घातल्याने शनीचे दोष तसेच कुंडलीतील इतर ग्रहपीडा दूर होते.
४. घरात कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर रुग्णाच्या बरे होण्याची शक्यता वाढते.
५. माशांना पिठाचे गोळे खायला दिल्यास कर्जातून मुक्ती मिळते.
६. माशांना पिठाचे गोळे खाल्ल्याने घरात सुख आणि शांती नांदते.
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
७. संतती सौख्य लाभते, मुलांची प्रगती होते.
८. यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते.
९. माशांना पिठाच्या गोळ्या दिल्याने संपत्ती, वैभव प्राप्ती होते.
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
१०. भगवान विष्णूंनी सत्ययुगात माशांचा अवतार घेतला, म्हणून मासे अतिशय शुभ मानले जातात. माशांना अन्न देऊन पूर्वज समाधानी होतात आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात.