Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 10:12 IST2025-09-12T10:11:29+5:302025-09-12T10:12:00+5:30
Pitru Paksha 2025: पितृ पंधरवड्यात श्राद्धविधीसाठी तसेच पितृदोष निवारणासाठी १५ दिवस मिळतात, पैकी एक आठवडा संपत आला, उरलेल्या कलावधीत दिलेले उपाय अवश्य करा.

Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
पितृपक्षाचा(Pitru Paksha 2025) एक आठवडा संपत आला आहे. या काळात अनेकांनी आपल्या पितरांच्या तिथिनुसार श्राद्धविधी केले असतील, तर काही जण येत्या आठवड्यात करणार असतील, पण ते करूनही पितृदोषाचा प्रभाव कमी झाला नाही असे जाणवते का? त्यासाठी मुळातच पितृ दोष कसा ओळखावा(How to remove Pitru Dosha?) आणि त्याचे चिन्ह दिसत असल्यास त्यावर अचूक उपाय कोणते करावेत ते जाणून घेऊ.
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
पितृपक्षातील पंधरा दिवसात आपले पूर्वज अर्थात पितर आपल्या वंशजांच्या भेटीसाठी पृथ्वीलोकात परत येतात अशी आपली श्रद्धा असते. आपल्या पितरांना गती मिळावी म्हणून आपण श्राद्ध करतो. दानधर्म करतो. त्यांना नैवेद्य दाखवतो. काक स्वरूपात येऊन त्यांनी प्रसाद ग्रहण करावा असे विनवतो. मात्र तसे झाले नाही तर पितर आपल्यावर नाराज तर नाहीत ना या विचाराने साशंक होतो. याचसंदर्भात पुढील माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकेल.
>> पितृ दोष दूर होण्यासाठी पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी केले जातात. मात्र तसे करूनही पितृदोष दूर झाला नाही हे कसे ओळखावे तर? घरातील व्यक्ती सतत तणावाखाली असते. अथक प्रयत्न करूनही व्यवसायात नुकसान होते. करिअरची वाढ थांबते. वैवाहिक जीवनात संघर्ष वाढू लागतो. तरुण-तरुणींच्या विवाहात अडथळे येतात.
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
>> जेवणात केस येणे, दगड येणे, अन्न कुजणे ही लक्षणेदेखील पितृदोष दर्शवतात. तसेच स्वप्नात पितरांचे दर्शन घडते परंतु स्वप्नातही ते नाराज दिसतात, रडताना दिसतात. यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळते आणि घरावर नैराश्य पसरते.
>> कोणतेही शुभ कार्य सुरू करायला गेल्यास अडथळे येऊ लागतात. शुभ कार्याच्या दिवशी घरात वाद, भांडण, तंटा सुरु होतो. मारामारी सुरू होते किंवा काही अशुभ घटना घडू लागतात. आनंदाचा प्रसंग दुःखात बदलतो. मुले होण्यात अडचणी येऊ लागतात.
पितृदोषावर श्राद्धकाळात करण्याचे उपाय:
अशी लक्षणे माणसाच्या जीवनात दिसू लागल्यास पितृ दोष आहे असे समजावे. अशा परिस्थितीत पितरांना लवकरात लवकर प्रसन्न करण्याचे उपाय करावेत.
>> दान करा. गोदान अर्थात गायीचे दान करा आणि ते शक्य नसेल तर गायीला नियमितपणे चारा पाणी करा.
>> पितरांच्या शांतीसाठी विधी करा.
>> कावळ्यांना तसेच गायीला अन्न दान करा.
>> भगवान शंकराचे ध्यान करताना 'ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्; मंत्राचा रोज जप करा.
पितृपक्षामुळे महत्त्वाची खरेदी पुढे ढकलताय? थांबा! 'या' मुहूर्तावर केलेली खरेदी देईल दुप्पट लाभ!