शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Pitru Paksha 2024: यंदा पितृपक्षाची सुरुवात कधीपासून? पंधरा दिवसांचाच काळ का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 10:53 IST

Pitru Paksha 2024: यंदा १८ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी महालयारंभ होत आहे; हा काळ निवडण्यामागील शास्त्रार्थ जाणून घेऊया.

आपल्या सनातन हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार आपले सण मानवाच्या विकासासाठी आणि हितासाठी, खूप अभ्यास करून पूर्वजांनी, ऋषि मुनींनी आखून दिलेले आहेत. म्हणजे कधीही सुखाचा वा दुःखाचा अतिरेक होऊन कंटाळा वाटू नये अशी त्यांची आखणी आहे. अगदी सण, वार, उत्सव देखील निसर्गाशी संबंधित वातावरणाशी निगडीत आखलेले आहेत. इतके सुंदर आखीव रेखीव कालनिर्णय जगाच्या पाठीवर कुठेच दिसणार नाही. ही आहे आपली हिंदू संस्कृती आणि संस्कार. यंदा १८ सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा (Bhadrapad Paurnima 2024) आहे आणि त्याच दिवशी महालयारंभ (Mahalaya Arambh 2024) अर्थात पितृपक्षाचा (Pitru Paksha 2024) काळ सुरू होत आहे; हा काळ निवडण्यामागील शास्त्रार्थ जाणून घेऊया. 

आता बघा ना श्रावण उपास तापसांचा, भजन पूजनाचा गेला, त्यामागोमाग आपले गणराज आले आले काय आणि गेले गेले काय! आणि आता ‘श्रद्धा’ पूर्ण होते न होते तोच केवळ एका कानाच्या फरकाने ‘श्राद्ध’ सुरू झाले. परंतु, हे पंधरा दिवस श्राद्धासाठी राखीव का ठेवले असावेत, यामागचे शास्त्रीय कारण जाणून घेऊ.

पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा, भाद्रपद वद्य पक्ष व महालय असे शब्द आपण वापरतो. महालयाकरिता भाद्रपद पक्षच का निवडला, याचे कारण फार पूर्वी अश्विन महिन्यापासून वर्षारंभ होत असे आणि भाद्रपदाअखेर वर्ष समाप्त होत असे. वर्षाच्या शेवटी सर्व पितरांच्या तृप्तीकरिता एक महालय श्राद्ध करण्याची चाल उत्पन्न झाली. हे कृत्य विशेषत: कृतज्ञता बुद्धीने केले जाते. 

स्वर्गात सहा महिन्यांचा दिवस व सहा महिन्यांची रात्र, असा काळ असतो. त्यालाच आपण दक्षिणायन व उत्तरायण असे म्हणतो. भाद्रपद महिन्यात आपण महालय श्राद्ध करतो, ती दक्षिणायनात करतो. दक्षिणायन म्हणजे स्वर्गातील रात्र आणि पितृलोकातील दिवस. स्वर्ग हा पृथ्वीच्या उत्तर बाजूस असून, पितृलोक दक्षिणेकडे आहे. त्यावेळी दक्षिणेकडील पितृलोकात दिवस असतो. पितरांना उद्देशून कोणतेही कृत्य करायचे झाले, तर दक्षिणायनातच केले जाते. म्हणून आताच्या सणवारानुसार गणपती आणि नवरात्र या दरम्यान पितृपक्षाचा काळ राखीव ठेवला जातो. 

ज्याप्रमाणे सुख दु:खाचा  फेरा सुरू असतो, त्याप्रमाणे सण वार उत्सव यांमुळे निसर्गात, समाजात, मानवात चैतन्याची लाट पुन्हा पुन्हा उसळत राहावी, यासाठी धर्मशास्त्राने केलेली ही सुंदर आखणी आहे. श्राद्धकाळ झाला, की मनावर आलेले मळभ दूर होऊन नवरात्रीची घटस्थापना होते. गरबा रंगतो. दसरा साजरा होतो आणि दिवळीची तयारी सुरू होते. अशा या आनंदात आपल्या पितरांचे स्मरण राहावे यासाठी हा पितृपक्षाचा काळ आहे, तोही आपण सेवाभावी वृत्तीनेच पार पाडला पाहिजे. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३