शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

पितृपक्षात श्राद्धाच्या भोजनातील कोणते पदार्थ पितरांना तृप्त करतात? पाहा, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 8:53 PM

पितृपक्षात श्राद्ध विधि करताना भोजन, पिंडदान, तर्पण, वैश्वदेव हे त्यातील महत्त्वाचे अंग आहेत.

पितृपक्षात श्राद्ध विधि करताना भोजन, पिंडदान, तर्पण, वैश्वदेव हे त्यातील महत्त्वाचे अंग आहेत. भोजनामुळे तृप्ती झाल्याशिवाय तर श्राद्धाला पूर्णत्वच येऊ शकत नाही. परंतु प्रश्न असा पडतो की, पितरांना नेमके कोणते पदार्थ आवडतात? तर याचे उत्तर असे आहे की, आपण श्राद्धात जो स्वयंपाक करतो, तो घन किंवा द्रव स्वरूपात पितरांपऱ्यंत पोहोचत नाही. तर ते वायूरूपाने त्यांच्यापऱ्यंत पोहोचतो व ते तृप्त होतात. पितरांना तृप्त करणाऱ्या खाद्य पदार्थांची माहिती घेऊ या-

खीर : पितरांना खीर सर्वाधिक आवडते. त्यांच्या वासाने ते तृप्त होतात. काही ठिकाणी खीर दूध, तांदळाची असते. काही ठिकाणी गव्हाची असते. मग अनेक ठिकाणी त्यात प्रदेश परत्वे बदलही केले जातात. अनेक ठिकाणी त्यात सुकामेवा टाकला जातो. साखर, तूप, नारळाचा कीस, विलायची पावडर, केसर हेही टाकले जातात. घरोघरी अत्यंत श्रद्धेने खीर केली जाते. ती प्रसाद म्हणूनही घेतली जाते. पितरांना उकळलेले गोड पदार्थ आवडतात. 

मध : पितरांना खिरीच्या बरोबरीने मध आवडतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जेवणात पोळीवर मध वाढण्याची पद्धत आहे. मधु वाता ऋतायते मधु क्षरन्ति सिन्धवः । माध्वीर्नः सन्त्वोषधीः या मंत्राने मध वाढला जातो. अनेक ठिकाणी मध वाढण्याची प्रथा नाही. तेथे केवळ मंत्र म्हटला जातो. परंतु श्राद्धात मधाचेही तेवढेच महत्त्व आहे, हे ध्यानात ठेवावे.

पुरी : अनेक ठिकाणी पितरांना आवडणारी पुरी केली जाते. यातही प्रदेश परत्वे बदल केले जातात. 

पुरणपोळी : पितर पुरणपोळीने तृप्त होतात. गहू, चना डाळ, साखर, केसर, विलायची, जायफळ, शुद्ध तूप टाकून केलेल्या पुरणाच्या वासाने पितर तृप्त होतात. यामध्ये सर्व प्रकारचे सत्व आल्यामुळे या पोळीला पूर्णपोळी किंवा पुरणपोळी म्हणतात. देवांनाही ही पोळी प्रिय आहे. 

रसमलाई : पितरांना दुधाचे पदार्थ आवडतात. त्यामुळे काही ठिकाणी खीर तर काही ठिकाणी रसमलाई श्राद्धात भोजनासाठी केली जाते. यातही ड्रायफ्रूटस टाकल्यास उत्तम. 

रसगुल्ले : काही ठिकाणी प्रदेशनुसार रसगुल्लेही श्राद्धविधीमध्ये भोजनासाठी केले जातात. याच बरोबर पूर्वजांना सर्वांत जास्त आवडणारे पदार्थही केले जातात. त्यांच्या वासामुळे ते तृप्त होतात, अशी आपल्याकडे मान्यता आहे. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष