पापमोचनी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला 'पापमोचनी' म्हणतात कारण या दिवशी व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांतून मुक्ती मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा १५ मार्च रोजी रविवारी पापमोचनी एकादशी(Papmochani Ekadashi 2026) आली आहे, त्यानिमित्त सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Astrology: 'अच्छे दिन' येण्यापूर्वी मिळतात 'हे' शुभ संकेत; ओळखा तुमच्या आयुष्यातील ६ दैवी बदल!
पापमोचनी एकादशी ही भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. आयुष्यात कळत-नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मनाची शुद्धता करण्यासाठी हे व्रत आवर्जून केले जाते.
पूजेची पूर्वतयारी
दशमीचे नियम: एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी (१४ मार्च) सात्विक आहार घ्यावा. सूर्यास्तानंतर शक्यतो भोजन टाळावे.
साहित्य: भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो, पिवळी फुले, तुळशीची पाने, धूप, दीप, फळे, पिवळे चंदन आणि पंचामृत.
एकादशीचा पूजा विधी
१. ब्रह्ममुहूर्तावर स्नान: रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकणे शुभ मानले जाते.
२. व्रताचा संकल्प: देवघरात दिवा लावून हातामध्ये अक्षता आणि पाणी घेऊन "मी माझे सर्व पाप नष्ट व्हावेत आणि ईश्वरी कृपा मिळावी यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत करत आहे," असा संकल्प करावा.
३. विष्णू पूजन: भगवान विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा. त्यांना पिवळी वस्त्रे आणि पिवळे चंदन अर्पण करावे.
४. तुळशीचे महत्त्व: भगवान विष्णूंना तुळशीची पाने अत्यंत प्रिय आहेत, त्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. (टीप: रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत, त्यामुळे शनिवारीच पाने तोडून ठेवावीत).
५. आरती आणि नामस्मरण: 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनामाचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते.
६. कथा श्रवण: या एकादशीची पौराणिक कथा वाचावी किंवा ऐकावी, कारण कथेच्या श्रवणाशिवाय व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असे मानले जाते.
Numerology: वेलची की चांदीचे नाणे? तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी काय आहे 'लकी'?
उपवासाचे नियम
या दिवशी पूर्ण उपवास (निराहार) करणे उत्तम मानले जाते. जर शक्य नसेल तर फलाहार करावा.
एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे वर्ज्य आहे.
कोणाचीही निंदा-नालस्ती करू नये आणि दिवसभर सात्विक विचार ठेवावेत.
पारायण आणि व्रत सांगता (पारण)
एकादशीच्या व्रताची सांगता दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (१६ मार्च) सकाळी सूर्योदयानंतर द्वादशी तिथीला केली जाते. ब्राह्मणांना किंवा गरजूंना दान-दक्षिणा देऊन उपवास सोडावा.
Web Summary : Papmochani Ekadashi, observed on March 15th, is dedicated to Lord Vishnu. It is believed to absolve sins through fasting and prayer. Rituals include a purifying bath, Vishnu worship with yellow offerings, and reciting mantras. The fast is broken the next day with charity.
Web Summary : 15 मार्च को मनाई जाने वाली पापमोचनी एकादशी भगवान विष्णु को समर्पित है। माना जाता है कि यह व्रत और प्रार्थना के माध्यम से पापों को दूर करती है। अनुष्ठानों में शुद्धिकरण स्नान, पीले प्रसाद के साथ विष्णु पूजा और मंत्रों का जाप शामिल है। अगले दिन दान के साथ व्रत तोड़ा जाता है।