आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:56 IST2025-09-09T17:55:44+5:302025-09-09T17:56:20+5:30
Numerology: आज ९ सप्टेंबर २०२५ अंकशास्त्राच्या दृष्टीने ही तारीख फार महत्त्वाची आहे; झोपण्यापूर्वी दिलेला उपाय केल्याने लाभ होईल असेही ज्योतिषांचे म्हणणे आहे.

आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
आज ९ सप्टेंबर २०२५ आहे. अंकशास्त्राच्या दृष्टीने ही तारीख खूप महत्त्वाची मानली जात आहे. या तारखेचा मूलांक ९ येत आहे (९+९+२+०+२+५=२७ २+७=९) आणि ही तारीख एक दुर्मिळ योगायोग घेऊन आली आहे. आज मंगळवार आहे आणि मंगळ ग्रहाचा मूलांक ९ आहे. २०२५ वर्षाचा मूलांक देखील ९ आहे आणि त्याचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे, आज ९९९ चा एक मोठा योगायोग जुळून आला आहे.
ज्योतिषांच्या अनुसार आजच्या दिवशी मंगळ ग्रह अधिक सक्रिय असेल, ज्यामुळे स्वभावात थोडी उदासीनता, मनःस्ताप, रागाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवस मावळतीला जरी आला असला तरी झोपण्यापूर्वी सांगितलेला उपाय अवश्य करा.
आजचा दिवस संपेपर्यंत घ्या पुढील काळजी!
१. घराबाहेर एकटे जाऊ नका. कोणतेही धोकादायक काम करू नका.
२. कोणाशीही भांडण किंवा वाद घालू नका. इतरांच्या भांडणात पडणे टाळा.
३. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. घाईघाईत केलेले काम तुमच्यासाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकते.
४. आरोग्य आणि अन्नाची विशेष काळजी घ्या.
५. कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. कर्ज घेण्यापासून आणि कर्ज देण्यापासून दूर रहा.
७. गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय सध्यासाठी पुढे ढकला. मालमत्तेच्या बाबतीत कोणतेही मोठे व्यवहार करणे टाळा.
८. घरात तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू खरेदी करणे टाळा.
९. जास्त तामसिक किंवा जड अन्न खाणे टाळा.
१०. ज्यांच्या कुंडलीत मंगळ कमकुवत आहे त्यांनी विशेषतः काळजी घ्यावी.
आजच्या दिवसात पुढील उपाय केल्यास होईल चौपट लाभ :
१. हनुमंताची पूजा करा: विशेषतः हनुमान चालीसाचे पठण करा.
२. लाल रंगाचे कपडे, लाल फळे किंवा लाल वस्तू दान करा.
३. मंगल मंत्राचा जप करा: “ओम अंगारकाय नमः” चा जप करा.
४. व्यायाम: योगासने, प्राणायाम आणि हलका व्यायाम करा.
५. जर तुमच्या कुंडलीत मंगळ अशुभ असेल किंवा तुमची जन्मतारीख ९, १८ किंवा २७ असेल तर झोपण्यापूर्वी 'ओम हनुमतये नम:' मंत्राचा जप अवश्य करा.