Numerology: ११ जानेवारीला उघडणार ब्रह्मांडाचे दार; एक तीव्र इच्छा दिवसभरात दोनदा व्यक्त करण्याची संधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 14:07 IST2026-01-10T14:05:21+5:302026-01-10T14:07:35+5:30
Numerology: अंकशाश्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष तर आहेच, पण ११ जानेवारी रोजी ती संधी दिवसभरात दोनदा विशिष्ट वेळी मिळणार आहे, कशी ते पाहा.

Numerology: ११ जानेवारीला उघडणार ब्रह्मांडाचे दार; एक तीव्र इच्छा दिवसभरात दोनदा व्यक्त करण्याची संधी!
अध्यात्म आणि अंकशास्त्रानुसार (Numerology) '११:११' हा आकडा वैश्विक शक्तीशी संवाद साधण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग मानला जातो. येत्या ११ जानेवारी रोजी एक विशेष '११:११ पोर्टल' तयार होत आहे. या दिवशी विश्वाची ऊर्जा अशा स्तरावर असते की, तुम्ही केलेली कोणतीही इच्छा थेट ब्रह्मांडापर्यंत पोहोचते.
Bhogi Festival 2026: खेंगट, बाजरीची भाकरी आणि लोणी; संक्रांतीच्या आधी भोगी का महत्त्वाची?
जर तुम्हालाही तुमचे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल, तर ही संधी सोडू नका. जाणून घ्या मॅनिफेस्ट करण्याची अचूक पद्धत.
वेळ कोणती निवडावी?
या पोर्टलचा लाभ घेण्यासाठी दोन अत्यंत शुभ मुहूर्त आहेत-
१. सकाळी ११ वाजून ११ मिनिटे
२. रात्री ११ वाजून ११ मिनिटे
मॅनिफेस्टेशनची अचूक कृती
१. तयारी: जेव्हा ११ वाजतील, तेव्हा एक शांत जागा निवडा जिथे तुम्हाला कोणीही अडवणार नाही. डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या आणि मन पूर्णपणे शांत करा. तुमच्या मनात कोणताही संशय किंवा भीती नसावी.
२. लेखनाची प्रक्रिया (११:०० ते ११:१०): एक वही आणि पेन घ्या. तुमच्या मनातली जी एक सर्वात तीव्र इच्छा आहे, ती सलग ११ वेळा लिहा. लिहिताना ती इच्छा पूर्ण झाली आहे, असा 'प्रेझेंट टेन्स' (Present Tense) वापरा. उदा. "माझे नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, त्यासाठी मी खूप आनंदी आहे."
Chanakya Niti: लोकांमध्ये तुमची किंमत शून्य आहे? चाणक्य नीतीचे 'हे' ५ नियम वापरा, जग तुमचा आदर करेल!
३. व्हिज्युअलायझेशन (Visualisation): लिहिताना ती इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्हाला कसा आनंद होईल, याची स्पष्ट कल्पना (Vivid Imagination) करा. तो आनंद मनापासून अनुभवा.
४. बोलून व्यक्त करा (११:११ मिनिटांनी): जशी घड्याळात ११ वाजून ११ मिनिटे होतील, तशी तुम्ही लिहिलेली ती इच्छा सलग ११ वेळा मोठ्याने किंवा मनात स्पष्टपणे बोला. ही तुमची 'अफरमेशन' (Affirmation) असेल जी थेट विश्वाच्या ऊर्जेशी जोडली जाईल.
५. कृतज्ञता व्यक्त करा (Gratitude): पूर्ण कृती झाल्यावर डोळे मिटून शांत बसा आणि "माझी इच्छा ऐकल्याबद्दल धन्यवाद," असे म्हणून वैश्विक शक्तीचे (Universe) मनापासून आभार माना.
मकर संक्रांत २०२६: संक्रांत सण असूनही त्याला 'नकारात्मक' छटा का? रंजक आणि शास्त्रीय कारण माहितीय?
हे पोर्टल का महत्त्वाचे आहे?
११:११ हा आकडा 'जागृती' आणि 'संधी' दर्शवतो. ११ तारखेचे हे पोर्टल तुमच्या अंतर्मनाला विश्वाच्या फ्रिक्वेन्सीशी जोडण्याचे काम करते. यावेळी तुमचे लक्ष पूर्णपणे सकारात्मक गोष्टींवर असणे गरजेचे आहे.