Numerology: 'हा' मूलांक असलेल्या मुली उजळून टाकतात जोडीदाराचे भाग्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:22 IST2025-03-05T15:22:13+5:302025-03-05T15:22:49+5:30
Numerology: लग्नानंतर भाग्योदय होईल असे बाकीत अनेकांच्या बाबतीत वर्तवले जाते, त्याला कारणीभूत लेखात दिलेल्या मूलांकाची व्यक्तीही असू शकते.

Numerology: 'हा' मूलांक असलेल्या मुली उजळून टाकतात जोडीदाराचे भाग्य!
अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाशी आणि भविष्याशी संबंधित गोष्टी जन्मतारखेवरून कळू शकतात. या लेखात आपण अशा मूलांकाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या आपल्या जोडीदाराचे भाग्य उजळून टाकतात.
प्रत्येक जन्म तारखेसाठी एक एक विशिष्ट मूलांक संख्या असते, जी १ ते ९ दरम्यान असते आणि एखाद्या व्यक्तीच्या स्वभाव, व्यक्तिमत्व आणि जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी प्रकट करते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म २३ तारखेला झाला असेल तर त्याची मूलांक संख्या २+३=५ असेल. त्याचप्रमाणे ३,१२,२१ किंवा ३० रोजी जन्मलेल्या मुलींना मूलांक क्रमांक ३ मानला जातो. अंकशास्त्रानुसार ३ मूलांक असलेल्या मुली बुद्धिमान, स्वावलंबी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाच्या असतात. ते त्यांच्या करिअरमध्ये झपाट्याने यश मिळवतात आणि त्यांच्या सासरच्या लोकांचाही भाग्योदय करतात.
स्वामी ग्रह : ३ क्रमांकाच्या मुलींचा शासक ग्रह गुरू आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो. यश आणि समृद्धीचे प्रतीक असण्यासोबतच गुरु हा धर्म, शिक्षण, ज्ञान आणि अध्यात्मासाठी कारक ग्रह आहे. या कारणास्तव, मूलांक ३ असलेल्या मुलींमध्ये ज्ञान मिळवण्याची आणि जीवनात यश मिळविण्याची प्रबळ इच्छाशक्ती असते. त्याअध्यात्मात विशेष रस घेतात. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता आणि उत्कृष्ट कौशल्य असतात, जी त्यांना त्यांच्या करिअर आणि सामाजिक जीवनात यश मिळविण्यात मदत करतात.
करिअर : मूलांक ३ असलेल्या मुली मेहनती आणि स्वावलंबी असतात, ज्यामुळे त्या लवकर आपले ध्येय साध्य करतात. त्यांच्याकडे प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कौशल्य प्राप्त करण्याची क्षमता असते/ कला, मनोरंजन, बँकिंग, क्रीडा आणि लेखन यांसारखी क्षेत्रे त्यांच्यासाठी विशेषतः अनुकूल मानली जातात.
वैवाहिक जीवन : ३ मूलांक असलेल्या मुली त्यांच्या नातेसंबंधांना प्राधान्य देतात, परंतु त्यांच्या स्वाभिमानी स्वभावामुळे वैवाहिक जीवनात कधीकधी आव्हाने निर्माण होतात. मात्र, सासरच्यांसाठी त्या खूप भाग्यवान मानल्या जातात. त्यांच्या जोडीदाराला यश आणि समृद्धी मिळण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन संतुलित आणि आनंदी राहते.