Numerology: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 11:07 IST2026-01-02T11:06:13+5:302026-01-02T11:07:33+5:30
Numerology: अंकशाश्त्रानुसार पुढील जन्मतारखेच्या लोकांसाठी २०२६ हे वर्ष जणू काही इच्छापूर्तीचे वर्ष ठरणार आहे, ते भाग्यशाली कोण ते पाहू.

Numerology: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी
नवीन वर्षाची चाहूल लागली की प्रत्येकजण आपल्या भविष्याबद्दल उत्सुक असतो. २०२६ या वर्षाची एकूण बेरीज (२+०+२+६ = १०, १+० = १) येते. अंकशास्त्रानुसार '१' हा अंक सूर्य ग्रहाचा आहे. तसेच ६ हा अंक शुक्राचा मानला जातो. याच कारणामुळे १ आणि ६ या दोन मूलांकांच्या लोकांसाठी २०२६ हे वर्ष स्वप्नपूर्तीचे ठरणार आहे.
Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
मूलांक १: नेतृत्व आणि यशाची नवी उंची (जन्म तारीख: १, १०, १९, २८)
मूलांक १ असणाऱ्या व्यक्तींसाठी २०२६ हे वर्ष त्यांच्या स्वतःच्या अंकाशी जुळणारे आहे.
लीडरशिप (Leadership): कामाच्या ठिकाणी किंवा राजकारणात तुम्हाला मोठी जबाबदारी मिळेल. तुमच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होईल.
अडलेली कामे: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले जमीन-जुमल्याचे व्यवहार किंवा सरकारी कामे या वर्षी मार्गी लागतील.
पैसा आणि प्रतिष्ठा: तुम्हाला या वर्षी केवळ पैसाच नाही, तर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी (Fame) देखील मिळेल.
मूलांक ६: लक्झरी, पैसा आणि सुख (जन्म तारीख: ६, १५, २४)
मूलांक ६ चा स्वामी 'शुक्र' आहे आणि २०२६ चा स्वामी 'सूर्य' आहे. शुक्र आणि सूर्याचा हा संयोग या लोकांसाठी राजयोग घेऊन येत आहे.
मनी आणि कम्फर्ट (Money & Comfort): तुमच्या आयुष्यात आर्थिक आवक प्रचंड वाढेल. घर, गाडी किंवा सोन्याची खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल.
लक्झरी लाईफ: तुम्ही तुमच्या राहणीमानावर आणि सुखसोयींवर मोठ्या प्रमाणावर खर्च कराल. तुमचे जीवन अधिक विलासी होईल.
फेम (Fame): ग्लॅमर, फॅशन किंवा कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हे वर्ष 'मैलाचा दगड' ठरेल.
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
२०२६ मध्ये काय काय मिळेल?
१ आणि ६ मूलांकाच्या व्यक्तींना या वर्षी खालील गोष्टींचा लाभ होईल:
अडलेली कामे पूर्ण होतील: कोणत्याही क्षेत्रात तुमचे काम अडकले असेल, तर ते या वर्षी पूर्ण होईल.
करिअरमध्ये झेप: नवीन नोकरी किंवा व्यवसायातील मोठी भागीदारी तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल.
कौटुंबिक आनंद: घरातील वातावरण आनंदी राहील आणि शुभ कार्ये पार पडतील. पाहा व्हिडिओ -
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!