New year 2026: नवीन वर्षाला सामोरे जाण्याआधी 'ही' गोष्ट तुम्ही वाचायलाच हवी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 07:05 IST2025-12-27T07:00:10+5:302025-12-27T07:05:01+5:30

New year 2026: नवीन वर्षात नवीन स्वप्न पाहताना आणि नवीन आव्हान स्वीकारताना तुमची मानसिक तयारी पक्की हवी, ती कशी करायची ते या गोष्टीतून शिका.

New year 2026: You must read 'this' before facing the New Year! | New year 2026: नवीन वर्षाला सामोरे जाण्याआधी 'ही' गोष्ट तुम्ही वाचायलाच हवी!

New year 2026: नवीन वर्षाला सामोरे जाण्याआधी 'ही' गोष्ट तुम्ही वाचायलाच हवी!

एका महामार्गावर एक भला मोठा फलक लावला होता. त्यावर लिहिले होते, `जर सगळे करू शकतात, तर मीदेखील करू शकतो. मात्र, जर सगळ्यांना जमत नसेल, तर मला ते जमवायलाच हवे.' हे उद्गार आहेत, त्या प्रत्येक यशस्वी माणसाचे, ज्याने अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवल्या. 

याउलट, सामान्य माणसाचे उद्गार काय असते? 'जर सगळे करू शकतात, तर त्यांना करू द्या, मला ते करायचे नाही आणि सगळ्यांना जमत नसेल, तर मी तरी कशाला प्रयत्न करून पाहायचे?' 

सामान्य आणि असामान्य यांच्यातला हाच मुख्य फरक आहे. सामान्य लोक आव्हानाला घाबरतात, तर असमान्य लोक आव्हाने स्वीकारतात आणि यशस्वी होतात. पण मग, ही असामान्य लोक  यशाची गुरुकिल्ली घेऊनच जन्माला येतात का? नाही? तर ते स्वत: यशाचा मार्ग तयार करतात. 

यश आपोआप मिळत नाही, ते मिळवावे लागते. उत्तम महाविद्यालयात किंवा विश्वविद्यालयात प्रवेश मिळाला, म्हणून कोणी यशस्वी होत नाही. महाविद्यालयाचे यश, हे तुमचे व्यक्तिगत यश नाही. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर तासन् तास अभ्यास करून, विविध विषयांचे ग्रंथ वाचून, जास्तीत जास्त मेहनत घेऊन तुम्ही परीक्षेला सामोरे गेलात, तर यश तुमचेच असेल. 

जसे, यश आपोआप मिळत नाही, तसे यशस्वी लोकही आपोआप घडत नाहीत. मोठ्या हुद्द्याची, मोठ्या पगाराची नोकरी मिळाली, म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असे नाही. तर, तुमची कामाची पद्धत, सहकाऱ्यांशी वागणुक, कंपनीला यशस्वी होण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत तुम्हाला यशस्वी ठरवते. 

कोणतेही नाते आपोआप यशस्वी बनत नाही, ते प्रयत्नपूर्वक यशस्वी बनवावे लागते. कुंडल्या जुळल्या, व्यक्तिमत्त्व जुळली, राहणीमान जुळले, म्हणून लग्न यशस्वी होत नसते. तर, लग्न यशस्वी करण्यासाठी दोघांना सुसंवाद साधावा लागतो, समजून घ्यावे लागते, एकमेकांचा आदर करावा लागतो, तडजोड करावी लागते, तेव्हाच नाते यशस्वी बनते, टिकते आणि रुजते.

आध्यात्मिक शक्ती सहज मिळत नाही, ती मिळवावी लागते. नामांकित संस्थेत किंवा आध्यात्मिक गुरुंकडे शिकवणी लावली, म्हणजे तुम्हाला अध्यात्मिक शक्ती प्राप्त होत नाही. त्यासाठी तुम्हाला आत्मशक्ती वाढवावी लागते. संयम वाढवावा लागतो. मन केंद्रित करावे लागते. आध्यात्ममार्ग अनुसरावा लागतो. तेव्हा आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते.

थोडक्यात, कोणतीही गोष्ट आपसुख मिळत नसते, ती मिळवावी लागते आणि मिळाली, की ती टिकवून ठेवावी लागते. यासाठी प्रयत्न, अभ्यास, चिकाटी आणि प्रचंड सकारात्मकता असावी लागते. या गोष्टी आत्मसात केल्या, की तुम्हीच आत्मविश्वासाने म्हणाल, 'अशक्य काहीच नाही!'

Web Title : नया साल 2026: चुनौतियों को अपनाएं, दृढ़ता और सकारात्मकता से सफलता प्राप्त करें

Web Summary : सफलता के लिए प्रयास जरूरी है, भाग्य नहीं। कड़ी मेहनत, सकारात्मक रवैया और दृढ़ता से चुनौतियों का सामना करें। रिश्ते, आध्यात्मिकता और आत्मविश्वास विकसित करके अपने लक्ष्य प्राप्त करें। लगन से कुछ भी असंभव नहीं है।

Web Title : New Year 2026: Embrace Challenges, Achieve Success Through Perseverance and Positivity

Web Summary : Success demands effort, not luck. Overcome challenges with hard work, positive attitude, and perseverance. Develop relationships, spirituality and self-confidence to achieve your goals. Nothing is impossible with dedication.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.