शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:24 IST

Navratri 2025: अनेक भाविक नवरात्रीचे नऊ दिवस सात्त्विक आहार घेतात, तुम्हाला ही कल्पनाही अशक्य वाटत असली तरी त्यामुळे होणारे लाभ या व्रतासाठी प्रोत्साहित करतील.

नवरात्र(Navratri 2025) हा आई भगवतीच्या उपासनेचा काळ. या कालावधीत भगवद्भभक्तीत मन रमावे यासाठी मुख्यतः अन्नावरील वासना कमी करावी लागते. त्यासाठी आहारात काही पथ्य सांगितली आहेत. काही जण नऊ दिवस उपास करतात, पण सगळ्यांनाच तो जमणे शक्य नाही, म्हणून धर्मशास्त्राने दिलेले पथ्य का व कसे पाळायचे ते जाणून घेऊया. 

Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा

सत्व म्हणजे सात्विक भाव, रज म्हणजे राजस भाव आणि तम म्हणजे तामस भाव! आपला देह या त्रिगुणांनी भरलेला आहे. मात्र ज्यांचे सत्व जागे असते तेच रज आणि तम गुणांवर अंकुश घालू शकतात. रजोगुण अधिक असेल तर संसार आसक्ती कमी होणार नाही आणि तमोगुण अधिक असेल तर आपला आपल्या भावभावनांवर विशेषतः क्रोधावर नियंत्रण राहणार नाही. म्हणूनच आपला सत्व गुण अधिक कार्यक्षम करण्यासाठी धर्मशास्त्राने दिलेले पथ्य पाळयला हवे. त्यामागचे कारणही जाणून घेऊ. 

पलाण्डुभक्षणं पुनरुपनयम् ही शास्त्रोक्ती बऱ्याच वेळा कानावर येते. म्हणजे कांदा भक्षण केल्यावर पुन्हा मुंज करावी असे धर्मशास्त्र सांगते. यातच धर्मशास्त्राने कांदा सेवनाला केलेला निषेध लक्षात येतो. 

वास्तविक जमिनीखाली निपजणारे सर्वच कंद निषिद्ध आहेत. पण हिंदू धर्मात विशेषकरून कांदा व लसूण हे सर्वथैव त्याज्य मानलेआहेत. खाद्यपदार्थांची हिंसात्मक व निषेधात्मक प्रतवारी काढल्यास पाणी हे कमीतकमी म्हणजे दहा बारा टक्के निषिद्ध असते. ताजी फळे वीस पंचवीस टक्के निषिद्ध असतात. हविष्यान्नाचे पदार्थ म्हणजे दूधाचे पदार्थ त्याहून अधिक म्हणजे तीस ते पस्तीस टक्के निषिद्ध. नेहमीचे शाकाहारी पदार्थ चाळीस ते पंचेचाळीस टक्के निषिद्ध. कंदहार साठ टक्क्यांपर्यंत, कांदा लसूण ऐंशी टक्यांपर्यंत, अंडी नव्वद टक्क्यांपर्यंत, तर मांस-मासे-मद्य शंभर टक्के निषिद्ध मानले जातात. 

Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!

हिंदू धर्मात ऐंशी टक्क्याच्या आत असलेल्या पदार्थांच्या सेवनाला परवानगी आहे. म्हणून कांदा, लसूण वर्ज्य मानले आहे. कांद्याचे शास्त्रीय व मानसशास्त्रीय दृष्ट्या प्रयोग झाले आहेत.

कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चाळवणारा आहे. म्हणून कांद्याला कंदर्प म्हणजे मदन म्हटले आहे. कांद्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम रक्तात असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात थैमान घालतात. कांदा खाल्यावर काही वेळाने वीर्याची घनता कमी होते व गतीमानता वाढते. परिणामी विषयवासना वाढते. शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन, अजीर्णसारखे उदरविकार संभवतात. इतके असूनही आयुर्वेदाने कांदा व लसूण यांचा समावेश औषधी वनस्पतीत केला आहे. हृदयरोग असल्यास लसूण उपकारक ठरतो. 

त्याचप्रमाणे कांदा हा उष्णताहारक असल्यामुळे अंगात ज्वराधिक्य झाल्यास पोटावर, मस्तकावर कांद्याचा खिस ठेवून पोटात कांद्याचा रस गाळून देतात. पण जे पदार्थ औषधी गुणधर्मासाठी वापरले जातात, त्याचा सर्रास चवीसाठी वापर केल्यास ते प्रकृतीस व संस्कारास निश्चित हानीकारक ठरू शकते. धार्मिक कार्यात, देवाला नैवेद्य दाखवताना कांदा, लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाहीत. ते पावित्र्य जपले जाते. 

तसेच मांसाहार टाळण्याची वैज्ञानिक कारणे-

१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.

२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली  तर नवीन प्राणी जन्मालाच येणार  नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा  साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो.  त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते. 

सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता

३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.

४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते  हवेतील वाढलेल्या  जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. 

५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा,  धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक  घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतूंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.  अशा सर्व कारणांमुळे या दिवसांना धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे  आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.

सद्यस्थितीत सगळेच जण कांदा, लसूण, मांसाहार यांच्या एवढे आहारी गेलो आहोत, की त्यांच्याशिवाय स्वयंपाकघराचे पान हलत नाही. नवरात्रीच्या निमित्ताने मनावर आणि जिभेवर संयम ठेवण्यासाठी तरी हे व्रताचरण करून पाहावे, त्याचा तोटा तर नाहीच पण फायदा नक्की होईल! ज्यांना हे व्रत अंगिकारायचे असेल त्यांनी ३ ते १२ ऑक्टोबर या नवरात्रीच्या (Navratri 2025) कालावधीत दिलेल्या व्रताचे मनोभावे पालन करावे. 

टॅग्स :Navratriनवरात्रीfoodअन्नHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण