>> अस्मिता दीक्षित
हिंदू संस्कृतीत सणांची रेलचेल असते. ह्या सर्व सणातून आपल्याला आपल्या रूढी आणि परंपरा किती खोलवर रुजल्या आहेत ह्याची माहिती तर मिळतेच पण ह्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्याशी कशी निगडीत आहे हे सुद्धा समजते.
अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र सुरु होते आणि आदिशक्तीचा जागर सर्वत्र सुरु होतो. सूर्याचा हस्त नक्षत्रातील प्रवेश भोंडला म्हणजेच हादगा, ह्याचा श्रीगणेशा करतो .पूर्वीच्या काळी खेड्यापाड्यातून मुली पाटावर समृद्धीचे प्रतिक असणार्या हत्तीचे चित्र काढत. मनोभावे त्याची पूजा करून नैवेद्य दाखवून त्या पाटाभोवती फेर धरून गाणी म्हणत असत. समृद्धीचे प्रतिक असणार्या हत्तीचे पूजन गुजराथ ,कलकत्ता इथेही हा सण दुर्गा मातेची पूजा करून खूप मोठ्या प्रमाणत साजरा होतो. नवरात्रीच्या ९ रात्री देवी समोर आरती आणि फेर धरून गरबा खेळून जागवल्या जातात .महाराष्ट्रामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात देवीचा जागर करताना भोंडला खेळण्याची परंपरा आहे. भोंडला म्हणजे देवीची आरती करून फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणून खेळ खेळून रात्र जागवली जाते. आजकाल भोंडला म्हणजेच काय ते माहित नसल्याने भोंडल्याची गाणी तरी कशी माहिती होणार? त्याची माहिती व्हावी ह्यासाठी हा लेखन प्रपंच.
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
पूर्वीच्या काळी चूल आणि मुल इतकेच स्त्रीचे विश्व होते. त्यामुळे अशा सणांच्या निम्मित्ताने एकत्र जमणे, नवीन वस्त्र परिधान करून दागदागिने घालून आनंद साजरा करणे, ह्या गोष्टी त्यांना संसारात आनंद देऊन जात आणि नात्यातील गोडवा वृद्धिंगत होत असे. ह्या निम्मित्ताने घरातील स्त्रियांना नवचैतन्य मिळत असे आणि घरात गोडधोड होत असे, जुनी नाती कात टाकून पुन्हा नव्याने बहरत असत.
आपल्या माहेरची आणि सासरची माणसे, त्यांच्याबद्दल आपल्याला वाटणाऱ्या भावना, त्यांचे गोडवे गाणारी ही भोंडल्याची गाणी असत. काही कारणाने झालेली संसारातील धुसफूस आणि कलुषित झालेली मने ह्या निम्मित्ताने का होईना पुन्हा एकत्र होऊन आनंदाने फेर धरू लागत आणि पुन्हा एकदा संसारावर प्रेमाचे शिंपण होई. म्हणूनच माणसातील प्रेम ,विश्वास आणि एकमेकांबद्दल वाटणारी ओढ सतत कायम ठेवणाऱ्या ह्या सर्व सणांना अतिशय महत्व आहे. जग खूप पुढे जात असले तरी अजूनही खेड्यापाड्यातून नाही तर अगदी मुंबई पुण्यासारख्या औद्योगिक शहरातून सुद्धा आदिशक्तीचा जागर मोठ्या प्रमाणत होत असताना दिसतो.
आपल्या जवळचे मित्र, नातेवाईक आणि समाजातील सर्व स्तरातील लोक ह्या सणांच्या निम्मित्ताने आपली दुःख, वेदना काही काळापुरती विसरून आनंदाने एकत्र येतात म्हणूनच ह्या सर्व सणांना महत्व आहे.आजकालच्या आधुनिक काळात मुलामुलीना ह्या रूढी परंपरा माहित सुद्धा नाहीत. त्यामुळे येत्या काही वर्षात ह्या नामशेष होतील की काय अशीच भीती वाटते. आपणही समाजाचे ऋण लागतो आणि म्हणूनच ह्या सर्व रिती, रुढींची माहिती आपल्या पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांनीही हा वारसा जपावा म्हणून सर्वत्र होणाऱ्या ह्या आदिशक्तीच्या जागरात आपण सहभागी होऊन आपली परंपरांची मुल्ये जपली पाहिजेत.
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
स्त्रीला सुद्धा देवीचेच,लक्ष्मिचेच रूप मानून तिचा सन्मान केला पाहिजे. आपल्या संसाराचा गाडा घराघरातील गृहलक्ष्मी समर्थपणे चालवत आहे. ह्या साऱ्या शक्ती, आदिस्वरुपच आहेत आणि त्यांच्यासमोर आपण नतमस्तक झाले पाहिजे. येणाऱ्या सर्व पिढ्यांना आपल्या आईआजीकडून ह्या सर्व सणांचा अनमोल ठेवा, वारसा सुपूर्द व्हावा आणि त्यांनीही आपल्या पूर्वजांप्रमाणे आपल्या रूढी परंपरा जपाव्यात, त्या वृद्धिंगत व्हाव्यात हीच त्या जगदंबेच्या चरणी प्रार्थना. आपली संस्कृती, रूढी ह्यांचा ठेवा जपणे आणि तो पुढील पिढ्यांकडे सुपूर्द करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक सणात काहीतरी शिकवण आहे. आयुष्य कसे जगायचे ह्याचे गोड गुपित ह्या सर्व सणात दडलेले आहे. आदिशक्तीचा जागर असाच पुढेही चालत राहावा आणि तुम्हा आम्हा सर्वाना आई अंबेचा आशीर्वाद लाभावा हीच प्रार्थना.
उदाहरणादाखल भोंडल्याची गाणी :
ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवामाझा खेळ मांडिला वेशीच्या दारी , पारवं घुमतय पारावरीमांडला ग मांडला वेशीच्या दारी पारवळ घुमतं बुरजावरी गुंजावनी डोळ्यांच्या साजीव टिक्का.आमच्या गावच्या भुलोजी नायका एवीन गाव तेवीन गाव कांडा तिळूबाई तांदूळ घ्या आमच्या आयातुमच्या आया खातील काय दूधोंडे दूधोंड्यांची लागली टाळी आयुष्य दे रे ब्रम्हाळींमाळी गेला शेता भाता पाऊस पडला येता जाता पड पड पावसा थेंबोंथेंबी थेंबाथेंबी आळव्या बीआळव्या या लोंबती अंगणा अंगणात होती सात कणसं हादग्या तुझी सोळा वर्ष
श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं. असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं?वेडयाच्या बायकोने केले होते लाडूतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतलेवेडयाच्या बायकोने केला होता चिवडा तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले केरकचरा म्हणूनत्याने बाहेर फेकला वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या.तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्यावेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिलेबांगडया बांगडया म्हणून त्याने हातात घातल्या वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंडतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिलेक्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवयातिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्यावेडयाची बायको झोपली होती तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले.
एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलूदोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलूतीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलूचार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलूपाचा लिंबांचा पाणोठा माळ घाली हनुमंताला हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळं तोडीकमळाच्या पाठीमागे लपली राणी अगं अगं राणी इथे कुठे पाणी पाणी नव्हे यमुना जमुना यमुना जमुनाचीबारिक वाळू तेथे खेळे चिल्लारी बाळू चिल्लारी बाळाला भूक लागली सोन्याच्या शिंपीने दूधपाजलेपाटावरच्या गादीवर निजविले निज रे निज रे चिल्लारी बाळा मी तर जाते सोनार वाडासोनार दादा सोनार दादा गौरीचे मोती झाले की नाही गौरीच्या घरी तांब्याच्या चुली भोजन घातलेआवळीखाली उष्टया पत्रावळी चिंचेखाली पान सुपारी उद्या दुपारी
अक्कण माती चिक्कण माती खळगा जो खणावाअस्सा खळगा सुरेख बाई जातं ते रोवावं अस्सं जातं सुरेख बाई रवा-पिठी काढावी अश्शी रवा-पिठीसुरेख बाई करंज्या कराव्या अशा करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावंअस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अश्याप्रकारे भोंडल्याच्या गाण्यातून सर्व स्त्रिया आपली सुक्ख दुखे आवडी प्रेम सर्व काही भरभरून एकमेकीना सांगत असत . प्रेमाचे भरते आणि मोठ्यांचे आशीर्वाद ह्यात हे सर्व सण म्हणजे जणू आयुष्यात असलेले आनंदाचे चांदणे.
संपर्क : 8104639230
Web Summary : Navratri's Bhondla tradition in Maharashtra involves women singing and dancing around a decorated elephant, fostering community, joy, and preserving cultural heritage. It strengthens bonds and passes down traditions through generations.
Web Summary : महाराष्ट्र में नवरात्रि की भोंडला परंपरा में महिलाएं सजे हुए हाथी के चारों ओर गाती और नृत्य करती हैं, जिससे समुदाय, खुशी और सांस्कृतिक विरासत को बढ़ावा मिलता है। यह रिश्तों को मजबूत करता है और पीढ़ियों से परंपराओं को आगे बढ़ाता है।