नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:36 IST2025-09-25T15:35:39+5:302025-09-25T15:36:33+5:30
Navratri 2025 Lalita Sahasranama Significance: अश्विन शुद्ध पंचमी ही ललिता पंचमी म्हणून साजरी केली जाते. ललिता देवीचे सहस्रनाम अतिशय शुभ पुण्य फलदायी मानले जाते.

नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी!
Navratri 2025 Lalita Sahasranama Significance: जगदंबेच्या लीला अपरंपार आहेत. तिच्या पराक्रमाच्या अनेक कथा सर्वांनाच ज्ञात आहेत. तिच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत. शक्ती उपासनेमध्ये श्री ललिता सहस्रनाम, श्री दुर्गा सप्तशती आणि सौन्दर्यलहरी या ग्रंथांना विशेष महत्त्व. त्यापैकी श्री ललिता सहस्रनामाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी नवरात्रातील शुद्ध पंचमी म्हणजेच ललिता पंचमी आहे. या निमित्ताने ललिता सहस्रनाम पठण किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे.
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
२२ सप्टेंबर २०२५ पासून नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली आहे. ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी दसरा असून, या दिवशी नवरात्राची सांगता होणार आहे. षोडशी ही दशमहाविद्यांपैकी एक आहे. या देवीला ललिता, त्रिपुरसुंदरीसुद्धा म्हणतात. ललिता त्रिपुरसुंदरीची देवतांनी स्तुती केली आणि तिला भंडासुराचा वध करण्याची विनंती केली. देवी आणि भंडासुराचे युद्ध झाले. या कार्यात तिला अणिमा, महिमा, ब्राह्मी, कौमारी, वैष्णवी, वाराही, माहेंद्री, चामुंडी, महालक्ष्मी, नित्यादेवता आणि श्री यंत्राला व्यापून असणार्या अवर्ण देवतांचे साहाय्य होते.
श्री ललिता सहस्रनामाच्या उत्पत्तीची कथा । Lalita Sahasranama Katha
श्री ललिता सहस्रनामाची रचना अष्ट वाग्देवींनी केली असून, त्याचे निरूपण ब्रह्मांडपुराणाच्या उत्तर खंडात विष्णु अवतार हयग्रीव आणि अगस्त्य ऋषी यांच्या संवादाच्या रूपाने मांडले आहे. श्री दुर्गा सप्तशतीचे लेखक व्यास ऋषी असून ते मार्कंडेय पुराणात वर्णिले आहेत. सौन्दर्यलहरी हे वास्तवात शिवाने रचलेले शक्तीचे स्वरूप उलगडून सांगणारे काव्य आहे. परंतु, त्याचे जनकत्व आदि शंकराचार्यांकडे दिले जाते. त्याची एक वेगळी आणि विस्तृत कथा आहे.
श्री ललिता सहस्त्रनामात श्रीयंत्राचे वर्णन । Lalita Sahasranama Significance
श्री ललिता सहस्रनामाच्या सुरुवातीला देवांच्या आळवणीमुळे प्रसन्न होऊन श्री ललितादेवीच्या या चिदग्नी कुंडातून उत्पन्न होण्याची कथा आहे. यात तिच्या निर्गुण स्वरूपाचे वर्णन आहे. तिच्या सगुण रूपाचे वर्णन अत्यंत सुंदर आणि मोहक आहे. श्री ललितामातेचे हे कामेश्वरी रूप आहे. या रुपात तिचा विवाह कामेश्वररुपी शिवाशी होतो. तिच्या निवासस्थानाचे अर्थात श्रीयंत्राचे वर्णन आहे. श्री ललिता त्रिपुरसुंदरी अत्यंत अनुपम सौंदर्य स्वरूपात प्रकट होते.
श्री ललिता सहस्रनाम पठणाचे लाभ । Lalita Sahasranama Benefits
ललिता सहस्रनाम पठण केल्याने व्यक्तीला त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे आणि दुःख दूर करण्यासाठी आनंदी जीवनाचा आशीर्वाद देवी देते. ग्रहांचा अशुभ प्रभाव आणि परिणाम दूर होण्यास मदत होऊ शकेल. ग्रहदोष, वाईट नजर यांपासून मुक्तता मिळण्यास मदत होऊ शकते, असे म्हटले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.