शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

Navratri 2022: आश्विन मास सुरू होत आहे, जाणून घेऊया दुर्गापूजेच्या विविध पद्धती!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 4:35 PM

Navratri 2022: नवरात्रीत विविध पद्धतीने देवीचा जागर केला जातो, त्यापैकी काही प्रचलित पद्धतींची तोंडओळख करून घेऊया.

शिवपत्नी पार्वती म्हणजेच आदिशक्ती कालिमाता-भवानी-अंबा-जगदंबा-महालक्ष्मी हिची जी अनेक रूपे आहीत त्यामध्येच एक दुर्गेचे रूप आहे. घटस्थापना हा तिचा उत्सव आहे, सण आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत हे नवरात्र असते. यंदा २६ सप्टेंबरपासून आश्विन मास सुरू होत आहे आणि त्याच्या पहिल्या दिवसापासून अर्थात प्रतिपदेपासून नवरात्रीचा उत्सवही सुरू होत आहे. 

मातीची एक वेदी करतात. त्यावर घट स्थापन करून त्याभोवती धान्य पेरतात. घटावरील पात्रामध्ये दुर्गेची मूर्ती ठेवतात. तिचवर रोज एक याप्रमाणे झेंडूच्या किंवा तिळाच्या फुलांच्या माळा सोडतात. नंदादीप नऊ दिवस तेवत ठेवतात. सप्तशतीचा पाठ म्हणतात. काही ठिकाणी या दिवशी रोज एका कुमारिकेला जेवावयास बोलवतात किंवा काही ठिकाणी सवाष्णीला जेवायला बोलवतात. घटस्थापना हा एक कुळधर्मच आहे. 

महिषघ्नी महामाये चामुण्डे मुण्डमालिनीद्रव्यआरोग्य विजयं देहि देवि नमोऽस्तुते।

महिषासुराला मारणाऱ्या महामाया, चामुंडा आणि गळ्यात मुंडक्यांची माळा धारण करणाऱ्या देवी, मी तुला वंदन करतो. तू मला धन, आरोग्य आणि विजयश्री दे' असा मंत्र घटपूजेच्या वेळी म्हणण्यात येतो. 

दुर्गापूजेचा हा उत्सव बंगालमध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. भारतातील सर्व राज्यातही तो कमी जास्त प्रमाणात साजरा होत असतो. रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनीदेखील नवरात्र व्रत केले होते. रावणवध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला. म्हणून काहीजणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते. तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळनंतर उठवण्यात येते.

काहींच्याकडे घटस्थापनेसाठी मातीची वेदी केली जाते. घरच्या देवीचीही नऊ दिवस षोडशोपचारे पूजा केली जाते. काही जण घटस्थापना करून रोज एक एक माळ घटावर बांधतात. नवरात्रात काही ठिकाणी पशूबळी देण्यात येतो. 

या नऊ दिवसांत विशेषत: अष्टमीला काही घरांमध्ये जोगवा मागण्याचा कुळाचार आहे. देवीच्या नावाने इतरांच्या घरी जाऊन कोरड्या धान्याची भिक्षा मागतात व त्या धान्याचे भोजन नैवेद्य समजून घेतात, यालाच जोगवा म्हणतात. 

जोगव्याची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. पैकी एकनाथ महाराजांनी लिहिलेला जोगवा आजही एक सूरात घरोघरी गायला जातो...

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दना लागुनी ।त्रिविध तापाची कराया झाडणी ।भक्तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ मी घालीन ।हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा ।करुनी पोटी मागेन ज्ञानपात्रा।धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥पूर्ण बोधाची घेईन परडी ।आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।मनोविकार करीन कुर्वंडी । अद्भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥आता साजणी जाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग ।कामक्रोध हे झोडियेले मांग ।केला मोकळा मारग सुरंग ॥५॥ऐसा जोगवा मागुनी ठेविला ।जाउनी महाद्वारी नवस फेडिला ।एकपणे जनार्दन देखिला ।जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥

चला तर, आपणही आई जगदंबेचा जोगवा मागायला सज्ज होऊया...!

टॅग्स :Navratriनवरात्री