शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

Navratri 2022: नवरात्रीत देवीच्या रूपाचा आणि कर्तृत्त्वाचा जागर करणारी नऊ दिवसीय कथामाला सोमवारपासून सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 18:39 IST

Navratri 2022: नवरात्रीत आपण मातीत रुजवण टाकतो, तशी या चैतन्यमयी काळात वैचारिक रुजवणही महत्त्वाची आहे; त्यासाठी भावभक्तीने ओथंबलेले सदर लोकमत वाचकांसाठी!

नवरात्रीचे नऊ दिवस देवीचा जागर करण्यासाठी आपण पूजाअर्चा, उपासना तर करणार आहोतच, त्याबरोबरच वैचारिक विचारांचे बीज आपल्या मनात रुजावे यासाठी नऊ दिवसांची लेखमाला घेऊन येत आहोत. अमळनेरचे राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य, ह. भ. प. योगेश्वर उपासनी महाराज यांची ही लेखमाला असणार आहे. या लेखमालेत देवीच्या विविध रूपांचे तसेच तिच्या कर्तृत्त्वाचे दर्शन आपल्याला घडणार आहे. त्याची थोडक्यात झलक त्यांनी लिहिलेल्या कवितेतून आपल्याला दिसून येईल. 

पाहिले जेव्हा तुज असे ।।

सुस्नात कुणी ही देवकन्या शुभ्र वसने लेवुनी ।सर्वांग चर्चित भस्म तनु ध्यानस्थ जणु योगिनी। वदनी शांती तेज अनुपम धवल मधुरिम चंद्रमा ।त्या हि क्षय तू "अ-क्षया" उपमा तुला कुठली नसे ।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे ।      ...............पाहिले जेव्हा तुज असे ।। 1।।

चारु गात्री चपल चपला चंचला जणु दामिनी ।कमलनयनी शुकनासिका सुरभित ही सौदामिनी ।उन्नत उरोजा सिंहकटी उन्मत्त वन गज गामिनी। चालणे डौलात मोहक वनराज सिंहाहि ते नसे ।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे     .................पाहिले जेव्हा तुज असे।।2।।

कालरात्री रणचंडिका नरमुंडधारी कालिका ।दीर्घ हस्ता छिन्नमस्ता असुर मर्दन तालिका।  शिवा धात्री मंगला भद्रा निरागस बालिका ।शशी सूर्य नयनी दंत बकुळी हास्य मंजूळ छानसे।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे        .............पाहिले जेव्हा तुज असे।।3।।

भक्तीची तू मूर्त धारा गुप्त शक्ती संचालिका।ज्वलजहाल प्रखर तू शारद शीतल चंद्रिका।नामे अनेक रूपे तुझी तु विश्वजननी मातृका।स्तन्य देसी नवजीवना प्रतिभेस चढवी बाळसे।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे।         .............पाहिले जेव्हा तुज असे।।4।।

चारूगात्री ज्ञानदात्री अक्षयपात्री सुचारिता।शीघ्रगामिनी सिंहवाहिनी मधुरभाषिणी अमृता।शुद्ध स्वरूपा भिन्नरुपा संत मुनी जन कल्पिता।सविता ललिता दिव्यरूपा रुपास त्या वर्णू  कसे?।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे।        .............पाहिले जेव्हा तुज असे।।5।।

अन्नपूर्णे सदापूर्णे शारदे मधुर भक्ती प्रेम दे।यश श्री सामर्थ्य वैभव तेजस्विता चिर क्षेम दे।आरोग्य आनंद शांती सुखद शुद्ध सुगंधीत हेम दे।कृपा करी योगेश्वरी मज काव्य स्फुरू दे दिव्यसे।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे।        .............पाहिले जेव्हा तुज असे।।6।।

अष्टधे हे शर्मदे हे नर्मदे श्यामले विश्वमोहिनी।हे रंजिते असुरभंजिते सुरपूजिते शुभदायिनी।सुधे क्षमे अनृते हे कल्प कल्याण शुभ वर्षिणी।शरण तव चरण वंदी स्वर्गीय जेथे सुर सरि लसे।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे।        .............पाहिले जेव्हा तुज असे।।7।।

कमल दल अष्ट पाकळ्यां अंघ्रियुगुली तव अर्पितो।निर्मले निर्मल करी मज ज्ञान विमल शुभ प्रार्थितो।उन्मेष दे नवकल्पना दिव्य परतत्वस्पर्शी मर्ष दे।"योगेश्वरा" पद सानिध्य दे माँ कोड पुरवी अल्पसे।भान हरते बुद्धी कुंठित सर्वांग पुलकित होतसे।        .............पाहिले जेव्हा तुज असे।।8।।

।।।अक्षरयोगी।।।संपर्क : ९४२२२८४६६६/ ७९७२००२८७०

टॅग्स :Navratriनवरात्री