शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
4
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
5
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
6
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
7
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

Navratri 2021 : नवरात्रीत देवीची केवळ पूजा नाही तर 'शक्तीची उपासना' करा! - प.पु. पांडुरंगशास्त्री आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 11:37 AM

Navratri 2021 : या दिवसात आईजवळ शक्ती मागायची व आसुरीवृत्तीवर विजय मिळवायचा. नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवून आई जगदंबेची पूजा करून तिच्यापासून शक्ती प्राप्त करण्याचे दिवस, तेच नवरात्रीचे दिवस!

ठळक मुद्देआपल्या वेदानीही शक्तीच्या उपासनेला फारच महत्त्व दिले आहे. आपणही आळस झटकून, क्षणिक प्रमादाना दूर सारून पुन्हा शक्तीची उपासना सुरू केली पाहिजे.क्षणाक्षणाची शक्ती उपासना आपल्याला जडवादी जगात उभे राहायची शक्ती प्रदान करील. 

नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस. जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत, तर त्यांचे अस्तित्त्व टिकून धरण्यासाठी त्यांच्या पाठीमागे समर्थ लोकांच्या तपश्चर्येचे पाठबळ असणे आवश्यक असते. जगात तपश्चर्येला यश मिळते. ही गोष्ट सत्याच्या उपासकांनी विसरता कामा नये. तपश्चर्येच्या बळाने जगात पुष्कळ वेळा असत मूल्ये देखील विजयी झाली आहेत, ही गोष्ट आपल्याला उपरोक्त सत्याची अंधुक कल्पना देते. दुर्बळ लोकांचे सत्य, संस्कार किंवा संस्कृती यांची कोणी पूजा करत नाही. 

आश्विन महिन्यात येणाऱ्या या नवरात्र उत्सवाबाबत एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. महिषासुर नावाचा एक राक्षस अतिशय प्रभावी बनला होता. त्याने स्वत:च्या सामर्थ्याच्या बळावर सर्वच देवांना व मनुष्यांना 'त्राहि माम्' करून सोडले होते. दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट बनली होती व दैवी लोक भयग्रस्त झाले होते. 

धैर्य घालवून बसलेल्या देवांनी ब्रह्मा, विष्णु, महेश यांची आराधना केली. देवांच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या आद्य देवांना महिषासुराचा राग आला. त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैवीशक्ती निर्माण झाली. सर्व देवांनी जयजयकार करून ती सांभाळली, तिचे पूजन केली. तिला स्वत:च्या दिव्य आयुधांनी मंडित केली. या दैवी शक्तीने नऊ दिवस अविरत युद्ध करून महिषासुराला मारले. आसुरी वृत्तीला दाबून, दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करून देवाला अभय दिले. ही दैवी शक्ती तीच आपली जगदंबा!

या दिवसात आईजवळ शक्ती मागायची व आसुरीवृत्तीवर विजय मिळवायचा. आजही महिषासुर प्रत्येकाच्या हृदयात स्वत:चे स्थान जमवून बसला आहे आणि आत असलेल्या दैवी वृत्तीना गुदमरवून सोडले आहे. या महिषासुराच्या मायेला ओळखले पाहिजे. तिच्या आसुरी जुलमापासून मुक्त होण्यासाठी आवश्यकता आहे दैवी शक्तीच्या आराधनेची. नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवून आई जगदंबेची पूजा करून तिच्यापासून शक्ती प्राप्त करण्याचे दिवस, तेच नवरात्रीचे दिवस!

आपली चुकीची समजूत आहे, असूर म्हणजे मोठ्या दाताचे, मोठ्या नखांचे, लांब केसांचे, मोठे डोळे असलेले कोणी भयंकर राक्षस! खरे पाहता असुर म्हणजे 'असुषु रमन्ते इति असुर:' प्राणातच रममाण होणारे, भोगातच रममाण होणारे! तसेच महिष म्हणजे रेडा. त्या दृष्टीने पाहता रेड्याची वृत्ती बाळगणारा तो महिषासुर. रेडा नेहमी स्वत:चेच सुख पाहतो. समाजात ही रेड्याची वृत्ती पसरत चालली आहे. परिणामत: संपूर्ण समाज स्वार्थी, प्रेमविरहित व भावशून्य बनला आहे. समाजात आज व्यक्तिवाद व स्वार्थैकपरायणता अमर्याद बनून महिषासुर रूपात नाचत आहे. या महिषासुराच्या नाकात वेसण घालण्यासाठी आईजवळ सामथ्र्य मागण्याचे दिवस म्हणजे नवरात्राचे दिवस!

आपल्या वेदानीही शक्तीच्या उपासनेला फारच महत्त्व दिले आहे. महाभारताचे पानन् पान बलोपासना व शौर्यपूजा यांनी भरलेले आहे. व्यास, भीष्म व कृष्ण यांची सर्वच भाषणे तेज, ओज, शौर्य, पौरुष व पराक्रम यांनी भरलेली आहेत. महर्षी व्यासांनी पांडवांना शक्ती उपासनेचे महत्त्व समजावले आहे. त्यांनी पांडवांना उपदेश केला की, तुम्हाला जर धर्माची मूल्ये टिकवायची असतील तर हात जोडून, बसून चालणार नाही. शक्तीची उपासना करावी लागेल. अर्जुनाला दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी व्यासांनी स्वर्गात जाण्याची सूचना केली होती. 

अनादि कालापासून आसुरीवृत्ती सद्विचार, दैवी विचारावर मात करत आलेली आहे आणि दैवी विचार अडचणीत येताच देवांनी भगवंताजवळ शक्ती मागितली आहे. सामर्थ्य मागितले आहे आणि आसुरीवृत्तीचा पराभव केला आहे. केवळ सद्विचार आहेत तेवढे पुरत नाहीत. त्यांचे रक्षण होणेदेखील आवश्यक आहे. आणि त्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक आहे. 

आपणही आळस झटकून, क्षणिक प्रमादाना दूर सारून पुन्हा शक्तीची उपासना सुरू केली पाहिजे. `संघे शक्ति: कलौ युगे' ही गोष्ट ध्यानात ठेवून नवरात्राच्या दिवसात दैवी विचारांच्या लोकांची  संघटना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या संघटनेत प्रामुख्याने जगदंबा असेल आणि तिच्या भक्तीनेच आपल्यात शक्ती प्रगट होईल हे सुचवण्यासाठी नवरात्राच्या दिवसात गरबा किंवा रास यांच्या रूपात देवीच्या भोवती फिरायचे असते. देवीच्या सभोवती फिरता फिरता सांगितले पाहिजे की, `माते, तू आम्हाला सद्बुद्धी दे, आम्हाला संघबळ दे. आमच्या संघबळाच्या आड आमचा अहंकार येतो, आमची महिषवृत्ती जागृत होते, आमचे द्वेष उफाळून येतात, त्यांना तू खाऊन टाक.'

आई जगदंबेची आपली ही उपासना नवरात्रात सुरू होते. पण ती केवळ नऊ दिवसांपुरती सीमित राहू नये, हे ध्यानात ठेवण्याची गरज आहे. क्षणाक्षणाची शक्ती उपासना आपल्याला जडवादी जगात उभे राहायची शक्ती प्रदान करील. 

नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीच्या उपासनेचे दिवस. आईच्या पूजेचे दिवस. 'खा, प्या, मजा करा' अशा आसुरी विचारश्रेणीवर विजय मिळवण्याचा दिवस. संघशक्तीचे महत्त्व व भक्तीची महत्ता समजवण्याचे दिवस. तसेच तपश्चर्येचा महिमा व एकता यांचे महत्त्व समजवणारे दिवस. या दिवसात घुमत असलेला साधनेचा सूर पकडून जीवन समर्पणाच्या संगीताने भरून टाका!

जगदंब उदयोऽस्तु!

टॅग्स :Navratriनवरात्री