शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Navratri 2021 : महानवमीच्या दिवशी नवरात्रीत बसवलेल्या घटाचे दिलेल्या विधिवत पद्धतीने करा उत्थापन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 1:16 PM

Navratri 2021: महाअष्टमी आणि महानवमी या दोन्ही तिथीला एक विशेष गोष्ट समान असते. ती म्हणजे महिषासुरमर्दिनी स्वरूपातील देवीची पूजा महाअष्टमीच्या दिवशी केली जाते.

अश्विन शुद्ध नवमी या तिथीला 'महानवमी' म्हणतात. तसेच 'दुर्गानवमी' असेही एक नाव आहे. १४ ऑक्टोबर रोजी महानवमी आहे. शास्त्रानुसार या दिवशी नवरात्रीत बसवलेल्या घटाचे विधिवत उत्थापन केले जाते. अनेकांकडे नवरात्रीच्या दहाव्या दिवशी अर्थात दसऱ्याला घट हलवण्याची प्रथा आहे. आपल्या कुळाचारानुसार उत्थापनाचा दिवस निश्चित करून पुढे दिलेल्या माहितीनुसार उपचार करावेत. 

 व्रतकर्त्याने शुचिर्भूत होऊन भगवती देवीची पूजा करावी. तत्पूर्वी देवीचे पूजास्थान ध्वज, पताका, फुलमाळा, तोरण लावून सुशोभित करावे. प्रत्येकाने आपल्या शक्तीनुसार देवीची पंचदशोपचारी, षोडशोपचारी, षट्त्रिंशोपचारी किंवा राजोपचारी पूजा करावी. देवीला पक्वान्नांसहित भोजनाचा नैवेद्य दाखवावा. आरती करावी. याच दिवशी घटाची पूजा करून आरती झाल्यावर घटावर अक्षता वाहून घट विधिपूर्वक हलवले जातात.  तसेच घटाभोवती उगवलेले धान्य कुंडीत पेरून तसेच लक्ष्मी स्वरूपात त्यातील काही धान्य तिजोरीत ठेवले जाते.

इतरही अनेक पूजाविधी अश्विन शुक्ल नवमीला करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये देवीच्या पूजेबरोबर कुमारीकापूजन केले जाते. देवी मानून कुमारिकेचे पूजन करण्यासाठी ही कुमारिका दोन वर्षे ते दहा वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक असते. दोन वर्षांच्या मुलीला 'कुमारी' आणि नऊ वर्षांच्या मुलीला दुर्गास्वरूप मानतात.  

महाअष्टमी आणि महानवमी या दोन्ही तिथीला एक विशेष गोष्ट समान असते. ती म्हणजे महिषासुरमर्दिनी स्वरूपातील देवीची पूजा महाअष्टमीच्या दिवशी केली जाते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच महानवमीला तिच्यासाठी होम करून कोहळ्याचे बलिदान दिले जाते. मात्र तरीही महाअष्टमीला 'महालक्ष्मीव्रत' केले जाते, तर महानवमीला 'दुर्गानवमी' संबोधले जाते. कारण मुळात आदिमायेने महालक्ष्मीचे रूप धारण करून महिषासुराचा वध केला. म्हणून तिला महिषासुरमर्दिनी म्हणून संबोधले जाते. 

महाराष्ट्रात घराघरात आणि देवीच्या सर्व मंदिरांमध्ये नवरात्रात घटस्थापना करून प्रत्येक तिथीची विहित पूजा श्रद्धापूर्वक केली जाते. या महानवमीत देवीला कोहळ्याचे बलिदान दिले जाते. मात्र हे बलिदान फक्त मंदिरातून दिले जाते. 

अशा रितीने देवीचे नवरात्र साजरे होऊन दसऱ्याच्या आगमनाची घरोघरी तयारी केली जाते.

टॅग्स :Navratriनवरात्री