शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

‘नाम’ हेचि गुप्तधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:02 IST

परमात्म्यावर  पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर कोणत्याही जीवाला कधीही दु:ख करण्याची वेळ येत नाही.

 जन्मोजन्मिची तळमळी लागून जे हाती येते ते ‘गुप्तधन’ म्हणजे भगवंताचे नाम. एकदा का नामाची तळमळ लागली, की ते घ्यायला जीव आसूसतो. नामाचा शास्त्रशुद्ध अभ्यास, मनन आणि चिंतन करायला हवे. परमात्म्यावर  पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर कोणत्याही जीवाला कधीही दु:ख करण्याची वेळ येत नाही.मनुष्याच्या जीवनात शाश्वत आनंद परमात्म्याविणा कुठेही मिळत नाही आणि मिळणेही शक्य नाही. त्यामुळे मनुष्य जीवनात इतर कारणाने शाश्वत आनंद शोधण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ आहेत.शाश्वत आनंदासाठी, मला परमात्मा हवा, असेच प्रत्येक जीवाचे चिंतन असले पाहिजे. तीच आपली भक्ती आणि धारणा देखील असायला हवी. कारण भौतिक सुखाच्या नादापायी  मनुष्य खरोखर आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. त्याच वस्तूंचे तो चिंतन करतो आणि ध्यासही धरतो. परंतू वस्तू ही सत्य नाही. त्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. म्हणूनच तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो.  खरा आणि शाश्वत आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. म्हणूनच प्रत्येक जीवाने आपले मन परमात्म्याच्या चरणावर चिकटवून ठेवावे, आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा.  कधी तो सुखात राहील तर कधी दु:खात राहील; कधी तो बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. आपण परमात्म्याजवळ आनंद मागावा. त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तू रहितच असतो. आनंद जोडणाºया गोष्टींचा आपण विचार करूनच नामस्मरण करावे. काल जे झाले त्याबद्दल दु:ख करू नये; उद्या काय होणार याची काळजी करू नये; कारण  परमात्म्याला जे आपल्याला द्यायचं आहे. तो ते निश्चितपणे देणार आहे. भाग्यात असलेलं परमात्मा आणि सृष्टी आपणास कोठूनही आणुन देणार आहे आणि जे आपल्याला मिळालेलं नाही, ते आपल्या प्रारब्धात नव्हतं. जे आपणाला मिळालं नाही, त्याचं दु:ख करू नये. याउलट जे मिळालं आहे, त्याचेच मोल करावे. कोणत्याही परिस्थितीत जीवनात धीर सोडून नये.नाम संकिर्तन हा सर्व पाप नाशनाचा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच, नामाचा जीवाला चट्का लागायला हवा. नामाचा जीवाने ध्यास घ्यायला हवा. कारण हरिनाम नसलेले जीवन कोरडी विहिर, फळ न देणारे झाडं आणि दुध न देणाºया गायीप्रमाणेच आहे.

शेवटी...सुमीरन करले मेरे मना...तेरी बीती उमर हरि नाम बिना...

-शून्यानंद संस्कारभारती* खामगाव.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक