मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:25 IST2025-12-18T11:21:35+5:302025-12-18T11:25:02+5:30
Margashirsha Amavasya 2025: १९ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष अमावस्या आहे, इंग्रजी वर्षाखेरीस येणारी ही अमावास्या अधिक लाभदायी ठरावी म्हणून करा हा प्रभावी उपाय.

मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही वर्षातील सर्वात प्रभावी अमावस्यांपैकी एक मानली जाते. या रात्री काही विशेष ज्योतिषशास्त्रीय उपाय केल्यास कुंडलीतील दोष निवारण आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. १९ डिसेंबर २०२५ रोजी येणाऱ्या मार्गशीर्ष अमावस्येला(Margashirsha Amavasya 2025) शुक्र पर्वतावर केलेला एक छोटासा उपाय तुमचे नशीब पालटू शकतो.
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
शुक्र पर्वताचे महत्त्व
हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, अंगठ्याच्या खालच्या फुगीर भागाला 'शुक्र पर्वत' (Mount of Venus) असे म्हणतात. शुक्र हा सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आकर्षणाचा कारक आहे. जेव्हा या पर्वताशी संबंधित उपाय केले जातात, तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक चणचण आणि मानिसक तणाव दूर होण्यास मदत होते.
अमावस्येचा विशेष उपाय:
ज्योतिषी कुमार व्यास यांनी सांगितलेला हा उपाय अत्यंत सोपा पण प्रभावशाली आहे. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि अडकलेली कामे मार्गी लावण्यासाठी हा तोडगा आवर्जून केला जातो. १९ डिसेंबर रोजी रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करावा.
कसा करावा? :
पुरुषांसाठी: पुरुषांनी आपल्या डाव्या हाताच्या तळहातावरील शुक्र पर्वतावर (अंगठ्याच्या खालील फुगीर भागावर) लाल स्केचपेनने एक लहान 'फुली' (X) काढावी.
स्त्रियांसाठी: स्त्रियांनी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील शुक्र पर्वतावर लाल स्केचपेनने 'फुली' (X) काढावी.
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
दुसऱ्या दिवशी काय करावे? (सांगता विधी)
हा उपाय पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी खालील कृती करणे आवश्यक आहे:
१. सकाळी उठल्यानंतर चिमूटभर मीठ हातावर घ्या.
२. ज्या हातावर चिन्ह काढले आहे, त्या हातावर हे मीठ हलक्या हाताने चोळा.
३. त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवून टाका.
मिठाचा वापर का?
ज्योतिष आणि वास्तूनुसार मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे सर्वात मोठे साधन मानले जाते. जेव्हा आपण मिठाने हात धुतो, तेव्हा शरीरातील आणि मनातील साठलेली नकारात्मकता निघून जाते.
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
या उपायाचे फायदे (Benefits)
नकारात्मक ऊर्जा दूर होते: घरातील किंवा स्वतःभोवती जाणवणारी नकारात्मकता कमी होते.
कामातील अडचणी: जर तुमची कामे शेवटच्या क्षणी अडकत असतील, तर हा उपाय अडथळे दूर करण्यास मदत करतो.
मानसिक शांतता: अनावश्यक चिंता आणि भीतीपासून मुक्ती मिळते.
शुक्र ग्रहाची शुभता: शुक्र पर्वत सक्रिय झाल्यामुळे जीवनात सुख-सोयी वाढण्याची शक्यता निर्माण होते.
कोणतीही कृती पूर्ण विश्वासाने केल्यास त्याचे फळ लवकर मिळते.
टीप: हा एक श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रीय समजुतीवर आधारित उपाय आहे. पाहा या संबंधी व्हिडीओ -