Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:14 IST2025-11-10T15:13:03+5:302025-11-10T15:14:19+5:30
Manifestation: मॅनिफेस्ट टेक्निकबद्दल तुम्ही बरेच काही ऐकले, पाहिले असेल; ११ नोव्हेंबर रोजी तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष अनुभव घेऊन बघा.

Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
मॅनिफेस्टेशन(Manifestation) ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या विचारांना, भावनांना आणि विश्वासांना (Thoughts, Emotions, Beliefs) वापरून तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी किंवा परिस्थिती प्रत्यक्षात आणता.
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
हा आकर्षण सिद्धांताचा (Law of Attraction) एक भाग मानला जातो, ज्यानुसार ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित करता, त्याच गोष्टी तुमच्या जीवनात आकर्षित होतात. मॅनिफेस्टेशनचे मुख्य घटक पुढीलप्रमाणे आहेत -
१. स्पष्ट कल्पना (Clarity): तुम्हाला नेमके काय हवे आहे, याची अगदी स्पष्ट आणि सकारात्मक कल्पना किंवा ध्येय निश्चित करणे.
२. सकारात्मक विचार (Positive Thoughts): तुमचे ध्येय आधीच पूर्ण झाले आहे, यावर ठाम विश्वास ठेवणे आणि सातत्याने सकारात्मक विचार करणे.
३. भावना (Feeling): ते ध्येय पूर्ण झाल्यावर तुम्हाला कसा आनंद वाटेल, त्या भावना वर्तमानात अनुभवणे. ही 'अनुभूती' मॅनिफेस्टेशनसाठी सर्वात शक्तिशाली मानली जाते.
४. कृती (Action): नुसते विचार न करता, त्या ध्येयाच्या दिशेने छोटे-छोटे आवश्यक प्रयत्न (Inspired Action) करणे.
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
११ नोव्हेंबर २०२५ रोजी याच टेक्निकचा वापर करून आपण आपली इच्छापूर्तीचा प्रयत्न करणार आहोत. याबाबत टॅरो कार्डरीडर प्रियल यांनी त्यांच्या इन्स्टा व्हिडीओमध्ये ११:११ चे पोर्टल वापरा असे सांगितले आहे. ते कसे वापरायचे ते पाहू.
>> ११ नोव्हेंबर रोजी उघडत आहे ११:११ चे पोर्टल. या दिवशी तुमची कोणतीही इच्छा पुढील प्रकारे पूर्ण करू शकता.
>> त्यासाठी एक कोरा पांढरा कागद आणि लाल शाईचे पेन घ्या.
>> त्यावर एका खाली एक ११ अंक लिहा आणि त्या प्रत्येक अंकापुढे तुमच्या इच्छा किंवा एखादी इच्छा ११ वेळा लिहा.
>> इच्छा लिहिताना ती पूर्ण झाली आहे अशा स्वरूपात देवाचे आभार मानत लिहा. यालाच मॅनिफेस्ट करणे असे म्हणतात. स्वप्नपूर्तीचे चित्र तयार करा.
>> शेवटी इन्फिनिटी साइन काढा आणि तो कागद घडी घालून ११ दिवस झोपताना उशीखाली ठेवा.
>> त्यानंतर तो कागद जाळून टाका.
>> कालांतराने तुमची इच्छा पूर्ण होणार आहे ही खात्री बाळगा आणि स्वामींवर, सभोवतालच्या सृष्टीवर विश्वास ठेवा. ११:११ चे पोर्टल तुमची इच्छापूर्ती करेल.
व्हिडीओ लिंक -