शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

Mangalagauri 2024: महिलांनो! मंगळागौरीची पूजा करताना मौन पाळल्याने होतात शेकडो फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 11:12 IST

Mangalagauri 2024: जनात असो वा मनात स्त्रियांची अखंड बडबड सुरु असते, हे माहित असूनही मंगळागौरीची पूजा करताना मौन पाळल्याने होणारे फायदे जाणून घ्या!

श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांकडून मंगळागौरीचे (Mangalagauri vrat 2024) व्रत केले जाते. सुवासिनी स्त्रिया लग्नानंतर पाच वर्षांपर्यंत हे व्रत करतात. वटसावित्रीप्रमाणे हे व्रतही सौभाग्यदायक असून त्यायोगे पतीचे आयुष्य वाढते अशी श्रद्धा आहे. हे व्रत पहिल्या वर्षी माहेरी आणि पुढची चार वर्षे सासरी करतात.

मंगळागगौरीची पूजा म्हणजे उमामहेश्वराची पूजा. पती-पत्नी दोघांतील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते आणि त्यांची कृपा संपादन करण्यासाठीच ही पूजा केली जाते. या व्रतात मौनाचे महत्त्व आहे. पूजा करते वेळी मौन पाळून भक्तीपूर्वक देवीला शरण जावे, हा त्यामागील हेतू असतो. पूजा झाल्यावर सुवासिनीसमवेत आप्त नातलग मिळून स्नेहभोजन करतात. त्यावेळी ज्या वशेळ्या अर्थात नवीन लग्न झालेल्या आणि पूजेला बसलेल्या मुलींना विडा आणि दक्षिणा दिली जाते. हे सर्व होईपर्यंत मौन पाळायचे असते. जेवून तुळशीचे पान खाऊन मगच मौन सोडायचे असा या पूजेचा नेम असतो. गप्पा गोष्टींमध्ये चित्त विचलित होऊ नये व पूजेप्रती समर्पण भाव असावा यासाठी मौनाचे महत्त्व सांगितले आहे. 

रात्रीच्या वेळी सोळा काडवातींनी मंगलारती केली जाते. शिवगौरीच्या गुणगौरवाची, महिम्याची गीते, फुगड्या, गाणी, भेंड्या, आपल्या पतीचे नाव उखाण्यात घेणे, असे नानाविध कार्यक्रम करून हसत खेळत मंगळागौर जागवली जाते. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजेनंतर गौरीचे विसर्जन केले जाते. 

मौनाला एवढे महत्त्व का?

मौन धारण करणे म्हणजे फक्त न बोलणे नाही, तर न बोलण्याच्या प्रक्रियेबरोबर विचारचक्र थांबवणे. आपण मौन धरतो, तेव्हा मनातल्या मनात जास्त बोलत असतो, परंतु जेव्हा साधू संत, ऋषी मुनी, तपस्वी मौन धरतात तेव्हा ते शून्य विचारांच्या पोकळीत प्रवेश करतात. तिलाच समाधी अवस्था असेही म्हणतात. परंतु आपण प्रापंचिक जीव या अवस्थेपर्यंत पोहोचणे कठीण, तरीदेखील काहीही न करता, मनात कोणतेही विचार न आणता दिवसभरातुन फक्त दहा मिनिटे मौन धारण करू शकलो तर त्याचे अगणित फायदे होतात. 

आपल्याकडील प्रत्येक धामिर्क ग्रंथात मौनाचे महत्त्व दिले आहेच. स्नान, संध्या, जप, तप, देवपूजा, उपवास या वेळी मौन पाळावे, आनंदी राहावे. काही लोक तर आठवड्यातून एक दिवस मौन पाळतात. महात्मा गांधी आठवड्यातून एक दिवस मौन पाळत. त्या दिवशी त्यांच्याकडे येणाऱ्यांना ते कागदावर सांगणे लिहून देत.

बोलण्यामध्ये मनुष्याची फार शक्ति खर्च होते. अग्नितत्व आणि वायुतत्व, ही दोन तत्वं विशेष रुपाने बोलण्यात खर्च होतात. आता तासभर समजा कोणी बोलत असेल तर त्याच्या शरीरात उष्णता वाढते. जर तुम्ही दिवसाच्या १२ तासांपैकी, १६ तासांपैकी अनेक तास बोलतच राहिलात तर उष्णता वाढून तेवढी शक्ति उगाच खर्च होईल. कारण असलं म्हणजे तर बोलावंच लागतं परंतु निष्कारण आपण बोलत राहिलो, स्वतची बढाई मारण्यासाठी बोललो, काही निंदा करण्यासाठी बोललो तर आपल्या शरीराची उष्णता वाढते.

मौनाच्या अभ्यासाचं पहिलं पाऊल उचलायचं झालं तर- कारणावाचून बोलू नये. बोलायचं ते मोजकं असावं, नेमकं असावं. मनात काहीतरी एक असावं, शब्द काहीतरी वापरावे, हेतू आणखी काहीतरी तिसराच असावा, असं नसावं. मग ते बोलणं अराजक झालं पहा! अव्यवस्था झाली. म्हणून मौनाकडं जायचं असेल तर आधी वाणीमधील अव्यवस्था, अराजकता, अंदाधुंदी ही काढून टाकावी.

दुसरी व्यक्ती बोलत असताना त्या व्यक्तीचे बोलणे पूर्ण होईपर्यंत मौन धारण करावे, दोन व्यक्ती आपापसात बोलत असताना त्रयस्थाने मौन पाळावे. मोठी माणसे आपापसांत बोलत असताना लहान मुलांनी तिथे उपस्थित असल्यास साधारणपणे मौन पाळावे. अशा स्वरूपाचे संवाद कौशल्य विषयक संकेत असतात. काही परंपरा आध्यात्मिक आणि धार्मिक कारणास्तव तसेच, प्रार्थनेपूर्वी अथवा योगाभ्यासापूर्वी, तसेच विपश्यनेत मन शांत होण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून, मौन पाळण्यासाठी मार्गदर्शन करतात.

एकाग्रता होणे, ज्ञानोत्पन्न गंभीरता निर्माण होणे, सन्मार्गावर चालणे, मनावर योग्य संस्कार होणे,भांडणे/वादावादी न होणे, वाणीसिद्धी लाभणे हे मौनाचे अनेक गुण व फायदे आहेत. म्हणून मौन पाळा आणि मौनाचे आणखीही अगणित फायदे अनुभवा. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३