Mangal Gochar 2024: सोमवार ९ डिसेंबरपर्यंत मंगळाचा आहे स्तंभ, राशीनुसार प्रत्येकाने घ्या विशेष काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 12:59 IST2024-12-07T12:59:05+5:302024-12-07T12:59:49+5:30

Mangal Gochar 2024: ९ डिसेंबर पर्यंत मंगळाचे गोचर आहे,  तोवर राशीनुसार सांगितलेल्या गोष्टीत नेहमीपेक्षा जास्त काळजी घ्या!

Mangal Gochar 2024: Mangal's Stambha till Monday 9th December, according to zodiac sign everyone take special care! | Mangal Gochar 2024: सोमवार ९ डिसेंबरपर्यंत मंगळाचा आहे स्तंभ, राशीनुसार प्रत्येकाने घ्या विशेष काळजी!

Mangal Gochar 2024: सोमवार ९ डिसेंबरपर्यंत मंगळाचा आहे स्तंभ, राशीनुसार प्रत्येकाने घ्या विशेष काळजी!

>> सुमेध रानडे, ज्योतिष अभ्यासक, पुणे 

९ डिसेंबर पर्यंत मंगळ ग्रहाचा स्तंभ आहे, म्हणजे नेमके काय? तर आत्ताचे ग्रह, त्यांच्या भ्रमणामुळे जेव्हा आपल्यावर परिणाम करत असतात, तेव्हा त्याला गोचर परिणाम म्हणतात. "गोचर" म्हणजे ग्रहांचे चालणे.गोचर ही पद्धत तात्कालिक परिणाम करते. आज, उद्या, परवा, हा सप्ताह, हा महिना, या अशा काळासाठी फलित सांगण्याचे काम गोचर वरुन करता येते. मंगळ हा ग्रह आपल्या आयुष्यावर अनेक बरे वाईट परिणाम करतो. त्यामुळे त्याचे गोचर सुरु असताना प्रत्येकाने सावध पवित्रा घ्यायला हवा. हलगर्जी करून चालणार नाही. अशा वेळी नेमकी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊ. 

सोमवार ९ डिसेंबर पर्यंत मंगळाचा स्तंभ सुरु आहे. त्यामुळे येणारे दोन तीन दिवस सर्वसाधारणपणे सगळ्यांनीच वाहन सावकाश चालवावे, विजेच्या किंवा आगीच्या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त सतर्क राहावे, इंजिनिअर, सर्जन, पोलीस, सुरक्षा यंत्रणा, पेट्रोल, इंधन, वीजेशी निगडित क्षेत्रात काम करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी, मुख्य म्हणजे अथर्वशीर्ष/हनुमानचालीसा/दुर्गाकवच आवर्जून म्हणावे!

त्याचबरोबर राशीनुसार पुढील संदर्भात काळजी घ्यावी: 

मेष - डोकेदूखी, आग, वीज, वाहन, घर, जमीन या संदर्भात

वृषभ - घसा, दात, प्रवास, पत्र व्यवहार, मोबाईल, सुरी, कात्री या संदर्भात

मिथुन - डोळे, घसा, पैसे, दागिने, खाणंपिणं या संदर्भात

कर्क - नोकरीतील काम आणि वरिष्ठ, परीक्षा, प्रेमप्रकरण, मानसिक स्वास्थ्य या संदर्भात

सिंह - डोळे, पाय, दूरचे प्रवास, वाहन, मानसन्मान या संदर्भात

कन्या - भाऊबहीण, मित्रमैत्रीण, प्रवास, लाचलुचपत, कात्री सारख्या वस्तू या संदर्भात

तूळ - नोकरी व्यवसायातील काम, समाजातील मानसन्मान, जोडीदार, भागीदार, वैवाहिक आयुष्य या संदर्भात

वृश्चिक - डोकेदुखी, पित्तविकार, शत्रू, वडील किंवा ज्येष्ठ व्यक्ती, प्रवास या संदर्भात

धनू - खेळ, क्रीडा, पाठ कंबर, गुहेंद्रिये, डोळे, दूरचे प्रवास, संतती या संदर्भात

मकर - घर, जमीन, वैवाहिक आयुष्य, मूत्राशय, गर्भाशय या संदर्भात

कुंभ - कान, घसा, पोटदुखी, वरिष्ठ, मामा, पाळीव प्राणी, कात्री सारख्या वस्तू या संदर्भात

मीन - संतती, डोळे, खाणंपिणं, घसा, प्रेमप्रकरण, प्रवास या संदर्भात

भीती बाळगण्याचे कारण नाही, पण आवश्यक सतर्कता ठेवणे केव्हाही चांगले, नाही का? 

Web Title: Mangal Gochar 2024: Mangal's Stambha till Monday 9th December, according to zodiac sign everyone take special care!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.