माघ संकष्ट चतुर्थी २०२६: कसे करावे गणेश पूजन? पाहा, शुभ मुहूर्त, मान्यता अन् चंद्रोदयाची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:15 IST2026-02-04T12:06:27+5:302026-02-04T12:15:14+5:30

Sankashti Chaturthi February 2026 Moon Rise Timing: माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय झाल्यावर नेमके काय करावे? गणपती पूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या...

magh sankashti chaturthi february 2026 date shubh muhurat how to perform ganesh puja and know about moonrise chandrodaya time | माघ संकष्ट चतुर्थी २०२६: कसे करावे गणेश पूजन? पाहा, शुभ मुहूर्त, मान्यता अन् चंद्रोदयाची वेळ

माघ संकष्ट चतुर्थी २०२६: कसे करावे गणेश पूजन? पाहा, शुभ मुहूर्त, मान्यता अन् चंद्रोदयाची वेळ

Magh Sankashti Chaturthi 2026: मराठी वर्षातील माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे म्हटले जात आहे. अनेकार्थाने माघ महिना महत्त्वाचा मानला जातो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात प्रथमेश गणेश स्मरणाने केली जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत कधी आहे, या व्रतात गणपती पूजन कसे करावे, चंद्रोदय वेळ जाणून घेऊया...

प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. यंदा गुरुवार, ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी संकष्ट चतुर्थी आहे. 

संकष्ट चतुर्थी व्रत कोण करू शकते?

संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे.

संकष्ट चतुर्थी व्रताचरणात चंद्रोदयाला महत्त्व, काय करावे?

संकष्ट चतुर्थी व्रताचरणात चंद्रोदयाला महत्त्व असते. रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. अगदी काहीच शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. 

संकष्ट चतुर्थी विविध शहरांतील चंद्रोदय वेळ ( Sankashti Chaturthi February 2026 Moon Rise Timing)

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून ४७ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून ४२ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे
अहिल्यानगररात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे
वर्धारात्रौ ०९ वाजून २४ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून २६ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून ३५ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून ३५ मिनिटे
नागपूररात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून २८ मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता ३६ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून २९ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे
भंडारारात्रौ ०९ वाजून २० मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०९ वाजून २१ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून २७ मिनिटे


॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

Web Title : माघ संकष्टी चतुर्थी 2026: गणेश पूजन, शुभ मुहूर्त और चंद्रोदय का समय

Web Summary : 5 फरवरी, 2026 को माघ संकष्टी चतुर्थी शुभ है। इस दिन व्रत रखें, गणेश की पूजा करें, फूल और दूर्वा अर्पित करें। चंद्रोदय महत्वपूर्ण है; चंद्रमा को देखें, प्रार्थना करें और व्रत तोड़ें। भक्तों के लिए शहर के अनुसार चंद्रोदय का समय दिया गया है।

Web Title : Magh Sankashti Chaturthi 2026: Ganesh Pujan, Shubh Muhurat, Moonrise Time

Web Summary : Magh Sankashti Chaturthi on February 5, 2026, is auspicious. Observe fast, worship Ganesha, offer flowers and Durva. Moonrise crucial; view the moon, offer prayers, and break the fast. City-wise moonrise timings provided for devotees.