शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

Lunar Eclipse November 2022: त्रिपुरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या चंद्रग्रहण काळात 'ही' उपासना ठरेल फलदायी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 17:34 IST

Lunar Eclipse November 2022: ८ नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसले तरी या ग्रहण काळात उपासना करणे इष्ट ठरेल. 

८ नोव्हेंबर रोजी सन २०२२ वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. कार्तिक पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. चंद्रग्रहणाची सुरुवात म्हणजेच ग्रहणस्पर्श भारतात दिसणार नाही, तर चंद्रग्रहणाचा मोक्ष दिसेल. कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार असून, ते खग्रास पद्धतीने भारतात दिसणार आहे. ऐन दिवाळीत सूर्यग्रहण झाले होते. आता तुळशी विवाहाला चंद्रग्रहण होत आहे. हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे. ग्रस्तोदित चंद्रग्रहणाचा ग्रहणस्पर्श दुपारी ०२ वाजून ३९ मिनिटे असून, ग्रहण मध्य दुपारी ४ वाजून ३० मिनिटे आणि मोक्ष सांयकाळी ६ वाजून १९ मिनिटे आहे. त्रिपुरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर या काळात भगवान शंकराची आराधना करणे जास्त उचित ठरेल!

'ग्रहण' या शब्दात एवढी नकारात्मकता भरली आहे, की आपण एखादे होणारे काम होत नसले तर `काय ग्रहण लागले आहे', असे म्हणतो. या नकारात्मकतेतून ग्रहणाची तीव्रता लक्षात येते. ग्रहण ही भौगोलिक अवस्था आपल्या मानसिक अवस्थेवर तीव्रतेने परिणाम करते. यासाठीच ग्रहणकाळात देवाचे नाव घ्या असे सांगितले जाते. 

ग्रहणात गायत्री मंत्र करावा. याखेरीज अथर्वशीर्ष, पुरुषसुक्त, श्रीसूक्त, रुद्र, नवग्रहांचे मंत्र तसेच अथर्वशीर्षाची २१ आवर्तने करावीत. ग्रहणकाळात शक्यतेवढे नाम:स्मरण करावे. स्त्रियांनी स्तोत्र पठण जसे की, महिम्न, व्यंकटेशस्त्रोत्र, विष्णु सहस्त्रनाम, गणेश-देवी सहस्त्रनाम तसेच नामजप करावा. आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून जप करावा. जसे की, श्रीराम जय राम जय जय राम, नमो भगवते वासुदेवाय. इ. नाम घेत असताना आसन घ्यावे. पलंगावर बसू नये. लोळत पडू नये. आपली नित्यकर्म करत प्रभूचे नाम स्मरावे. 

सूर्य-चंद्र पृथ्वीवरून दिसणारे देव आहे. त्याला राहू व केतूच्या जाचातून मुक्त होईपर्यंत आपण देवाकडे प्रार्थना करावी. एकदा का ग्रहण सुटले, की आपत्ती टळली या विचाराने अन्न, वस्त्र, शिधा गरजूंना दान करावा. 

हे नियम आपल्या पूर्वजांनी पूर्वापार पाळले आहेत. आपणही यथाशक्ती सहयोग देऊन ईशकार्यात सहभाग घ्यावा आणि ग्रहणकाळ आपल्या नित्यकर्माबरोबरच परमेश्वर चिंतनात घालवावा.

टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहण