चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:49 IST2025-09-05T18:49:00+5:302025-09-05T18:49:27+5:30

Lunar Eclipse 2025: ०७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत, त्यात मुख्यतः अन्न आणि पाण्याची पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. 

Lunar Eclipse 2025: Remember to keep Tulsi leaves on food and stored water during the eclipse, because... | चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

यंदा भाद्रपद पौर्णिमेच्या(Bhadrapad Purnima 2025) दिवशी चंद्रग्रहण(Lunar Eclipse 2025) असणार आहे. त्यामुळे त्याची सावली आणि वातावरणातील प्रतिकूलता वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी काळजी म्हणून पुढील उपाय आठवणीने करावेत. 

Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

खग्रास चंद्रग्रहण भारतासह कुठे दिसणार?

२०२५ मधील भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत, असे सांगितले जात आहे. भारतासह हे खग्रास चंद्रग्रहण युरोप, आशिय खंडातील सगळे देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, आफ्रिका, पश्चिम उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेशात दिसेल. इंग्लंड, इटली, जर्मनी, फ्रान्स सारख्या युरोपातील जवळजवळ सर्व देशांमध्ये दिसेल. 

अन्न आणि पाण्यावर तुळशीचे पान 

केवळ ग्रहणातच नाही, तर ग्रहणाच्या आधी तीन ते चार तास वातावरण दूषित होऊ लागते. हा केवळ समज नाही, तर विज्ञानानेदेखील त्याला पुष्टी दिली आहे. त्यालाच शास्त्राने ग्रहणाचा वेध काळ म्हटला आहे. या दूषित वातावरणात अन्न, पाणी निषिद्ध सांगितले जाते. कारण, पृथ्वीला ऊर्जा आणि प्रकाश देणारे चंद्र, सूर्य ग्रहण काळात झाकोळले गेल्यामुळे अन्य सुक्ष्म जीव जीवाणूंचे प्राबल्य वाढते आणि त्यामुळे अन्न, पाणी दूषित होते. म्हणून ग्रहण काळात अन्न, पाणीदेखील वस्त्राने झाकले जाते व त्यात तुळशीचे पान टाकले जाते. तुळशीच्या पानामुळे अन्न, पाणी दूषित होत नाही आणि ग्रहणकाळ सुटल्यावर ते वापरण्यास योग्य ठरते.

पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या सुरुवातीलाच महालयारंभ असेही म्हणतात? दोन्हीचे अर्थ वेगळे की एकच? वाचा!

खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी पाहू : 

खग्रास चंद्रग्रहण: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५

खग्रास चंद्रग्रहण वेध सूतक काल: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून सुरू.

खग्रास चंद्रग्रहण स्पर्श: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ ०९ वाजून ५७ मिनिटे.

खग्रास चंद्रग्रहण संमीलन: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ ११ वाजता.

खग्रास चंद्रग्रहण मध्य: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ ११ वाजून ४२ मिनिटे.

खग्रास चंद्रग्रहण उन्मीलन: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ १२ वाजून २३ मिनिटे.

खग्रास चंद्रग्रहण  मोक्ष: शनिवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रौ ०१ वाजून २७ मिनिटे.

खग्रास चंद्रग्रहण पर्वकाळ: ३.३० तास.

Web Title: Lunar Eclipse 2025: Remember to keep Tulsi leaves on food and stored water during the eclipse, because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.