Lord Buddha: निसर्गाची भगवान बुद्धांप्रती कृतज्ञता; त्यांच्या कुरळ्या केसांमागची गोष्ट तुम्हाला माहीत आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:35 IST2026-02-10T16:16:59+5:302026-02-10T16:35:10+5:30
Lord Buddha: भगवान बुद्धांच्या डोक्यावर दिसणारे 'ते' कुरळे केस नाहीत, तर...; जाणून घ्या त्यामागची रंजक गोष्ट!

Lord Buddha: निसर्गाची भगवान बुद्धांप्रती कृतज्ञता; त्यांच्या कुरळ्या केसांमागची गोष्ट तुम्हाला माहीत आहे?
भगवान बुद्धांच्या मूर्ती किंवा चित्रे पाहिली की, सर्वात आधी लक्ष वेधून घेतात ते म्हणजे त्यांच्या डोक्यावरील कुरळे केस. परंतु, तुम्हाला माहीत आहे का? अनेक अभ्यासक आणि पौराणिक कथांनुसार, ते प्रत्यक्षात केस नसून काहीतरी वेगळंच आहे.
महाशिवरात्री २०२६: नशिबाची साथ कोणाला मिळणार? महादेवाच्या कृपेसाठी राशीनुसार करा 'हे' दान
भगवान बुद्धांची कोणतीही प्रतिमा पाहिली की आपल्या मनात एक प्रश्न नक्की येतो— सिद्धार्थ गौतम तर राजपुत्र होते, त्यांनी संन्यास घेताना आपले केस कापले होते, मग त्यांच्या डोक्यावर हे कुरळे केस कुठून आले? या प्रश्नाचं उत्तर एका ध्येयवेड्या तपस्येशी आणि निसर्गाच्या एका अद्भुत कृतज्ञतेशी जोडलेलं आहे.
संन्यास आणि मुंडन
बौद्ध ग्रंथांनुसार, जेव्हा राजपुत्र सिद्धार्थाने सत्य आणि ज्ञानाच्या शोधात गृहत्याग केला, तेव्हा त्यांनी संन्यासी परंपरेनुसार त्यांनी आपले मुंडन केले होते. परंतु, आपण आज बुद्ध मूर्तींवर कुरळे केस पाहतो. ते आले कुठून? तर...
१०८ गोगलगायींचे बलिदान
प्राचीन कथांनुसार, भगवान बुद्ध एकदा भर उन्हात एका झाडाखाली बसून ध्यानात मग्न होते. ते ध्यानामध्ये इतके तल्लीन झाले होते की, त्यांना कडक उन्हाचा आणि वाढत्या उष्णतेचा पत्ताही लागला नाही. त्यांचे डोके पूर्णपणे मुंडन केलेले होते.
त्याच वेळी तिथून एक गोगलगाय चालली होती. तिला जाणीव झाली की, बुद्धांच्या उघड्या डोक्यावर सूर्याची किरणे थेट पडत आहेत, ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो किंवा त्यांच्या ध्यानात बाधा येऊ शकते. बुद्धांना सावली मिळावी म्हणून ती गोगलगाय सरपटत त्यांच्या डोक्यावर जाऊन बसली. तिला पाहून इतर १०७ गोगलगायींनी देखील तिचे अनुकरण केले.
अशा प्रकारे एकूण १०८ गोगलगायींनी बुद्धांच्या डोक्यावर कवच तयार केले. गोगलगायींचे शरीर ओले आणि थंड असते, ज्यामुळे बुद्धांचे डोके थंड राहिले आणि ते तीव्र उन्हापासून वाचले.
त्यागाचे प्रतीक
असे म्हटले जाते की, कडक उन्हामुळे त्या १०८ गोगलगायींचा मृत्यू झाला, परंतु त्यांनी बुद्धांचे ध्यान भंग होऊ दिले नाही. जेव्हा बुद्ध ध्यानातून बाहेर आले, तेव्हा त्यांना त्या गोगलगायींच्या बलिदानाबद्दल कळाले. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या त्यागाची आठवण म्हणून बुद्धांच्या मूर्तीवर आजही ते 'कुरळे केस' (जे प्रत्यक्षात गोगलगायी आहेत) दाखवले जातात.
ऐतिहासिक आणि तांत्रिक दृष्टीकोन
काही इतिहासकारांच्या मते, गांधार आणि मथुरा कलाशैलीमध्ये जेव्हा बुद्धांच्या मूर्ती बनवल्या गेल्या, तेव्हा त्यांना एक 'महापुरुष' म्हणून दर्शवण्यासाठी त्यांच्या डोक्यावर 'उष्णीष' (Usnisha) किंवा कुरळे केस दाखवण्याची पद्धत रूढ झाली. निळ्या-काळ्या रंगाचे कुरळे केस हे महापुरुषाचे लक्षण मानले जात असे.