शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पौष शुक्ल षष्ठीला करतात, 'हे' सुगंधी व्रत!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 17, 2021 09:00 IST

पौष शुक्ल षष्ठीला म्हणजे १८ जानेवारीला, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत सुचवले आहे. काय आहे त्या व्रताचे वैशिष्ट्य, चला जाणून घेऊया. 

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते, असे म्हणतात. कारण वात्सल्य हा स्त्रीचा स्थायी भाव असतो. ती आपले सबंध आयुष्य आपल्या नातेवाईकांच्या संगोपनात घालवते. यातही आपल्या पाल्याप्रती तिचा ओढा जास्त असतो. शेवटच्या श्वासापर्यंत ती केवळ मुलांच्या हिताचा विचार करते. याच विचाराला आपल्या हिंदू संस्कृतीने व्रताची जोड दिली आहे आणि सांगड घातली आहे, निसर्गाशी! पौष शुक्ल षष्ठीला म्हणजे १८ जानेवारीला, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी एक व्रत सुचवले आहे. काय आहे त्या व्रताचे वैशिष्ट्य, चला जाणून घेऊया. 

या व्रताचे नावच 'सुगंधी' व्रत असे आहे.  पौष शुक्ल षष्ठीला हे व्रत केले जाते, म्हणून त्याला खसषष्ठी असेही म्हणतात. खस म्हणजे वाळा! अतिशय प्रसन्न करणारा सुवास असलेले हे एक प्रकारचे गवतच असते. शीतलता हा त्याचा गुणधर्म मानला जातो. वाळ्यापासून अत्तर, सरबत, पडदे, उदबत्या, पंखे अशा अनेक वस्तू बनवल्या जातात.

व्रतकर्त्या स्त्रीने या दिवशी उपास करावा. नंतर षष्ठीदेवीचे प्रतीक मानलेल्या वाळ्याची म्हणजे खस नामक गवताची श्रद्धापूर्वक पूजा करावी. एवढा साधा सोपा विधी या व्रतासाठी सांगितलेला आहे. या व्रतालादेखील एका कहाणीची जोड दिलेली आहे.

त्यानुसार एका बाईची सून देवाचा नैवेद्य चोरून खायची. परिणामी देवाच्या अवकृपेने तिची मुले लहान वयातच दगावत असत. त्यावेळी सासूने तिला पौष शक्ल षष्ठीला उपास घडवायचे ठरवले. त्यासाठी तिने सुनेला भरपूर कपडे धुण्यासाठी नदीवर पाठवले. एवढे सारे कपडे धुण्यात तिचा पूर्ण दिवस गेला. त्यामुळे आपोआप सुनेला उपास घडला. त्यावेळी सासूने षष्ठीदेवीच्या पूजेची सारी तयारी करून ठेवली होती. सासूने आपल्या भल्यासाठी एवढे सारे केले हे कळल्यावर सून आनंदली. मग तिने सासूच्या मार्गदर्शनाखाली षष्ठीदेवीची अतिशय श्रद्धापूर्वक पूजा केली. त्यामुळे देवी तिच्यावर प्रसन्न झाली. कालांतराने तिला पुढे जी अपत्यप्राप्ती झाली, ती सारी सुदृढ आणि दीर्घायुषी झाली.

यात देवाच्या अवकृपेचा भाग वगळता उर्वरित कथा ही निसर्गाशी जोडणारी, निसर्गाला देव मानून पूजा करा असे सांगणारी आहे. अनेकदा कथांमध्ये सांगोपांगी बदल होतात, अपभ्रंश होतात, त्यामुळे मूळ कथांचे अर्थ बदलतात. त्यामुळे पौराणिक कथांकडे आपण रूपक कथा म्हणून पाहणे योग्य ठरते. 

महाराष्ट्रात 'जरा जिवंतिका'सारखी व्रते अपत्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रचलित आहेत. तसेच हे विशेष व्रत बंगालमध्ये रूढ आहे. ते सर्वांना कळावे, म्हणून त्याचा इथे अंतर्भाव केला आहे. इतर वनस्पतीप्रमाने खस या बहुगगुणी, बहुउपयोगी सुगंधी गवताचे संवर्धन व्हावे. हा त्यामागचा उद्देश असावा. दुर्वांप्रमाणे कस म्हणजेच वाळ्यालाही पूजेत समाविष्ट करून पर्यावरणाचा किती सुक्ष्म विचार आपल्या पूर्वजांनी केला होता, हे कळल्यावर आपण आश्चर्यचकित होतो.