Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:56 IST2025-10-07T11:55:59+5:302025-10-07T11:56:31+5:30
Lifelesson: माझ्या नशिबात सगळं वाईटच लिहिलंय असं ज्यांना वाटतं त्यांनी अध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराजांनी सांगितलेल्या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
जीवनात सतत नकारात्मक आणि वाईट गोष्टींचा अनुभव येत असेल, तर मन खचून जाणे, निराश होणे स्वाभाविक आहे. अनेकांना असे वाटू लागते की आपल्या नशिबात सगळे वाईटच लिहिले गेले आहे. जेव्हा तुम्ही मेहनत करता आणि तरीही अपयश पदरी येते, तेव्हा 'माझ्या बाबतीतच असे का घडते?' हा प्रश्न मनात येतो. अशा वेळी, वृंदावनचे आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज आपल्याला एक अतिशय मोलाचा आणि दिलासा देणारा उपदेश देतात, जो या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो.
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
महाराज सांगतात की, आयुष्यात जे काही घडते, ते काही वाईट नसते; तर ती ईश्वराची तयारी असते. ते ठामपणे सांगतात, "आज जर तुम्हाला अपयश मिळाले आहे, तर हे निश्चित समजा की उद्या तुम्हाला मोठे यश मिळणार आहे." ईश्वराचा नियम असा आहे की तो तुम्हाला कधीही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त दु:ख देत नाही आणि तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच देतो. हे अपयश म्हणजे तुमच्या पुढील मोठ्या यशाची पूर्वतयारी आहे, हे लक्षात घ्या.
अपयशातूनच यशाचा पाया मजबूत होतो
महाराज आपल्या उपदेशात समजावून सांगतात की, मनुष्याला यश मिळण्यापूर्वी कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते. जसे सोन्याला अग्नीत तापवल्याशिवाय त्याला खरी किंमत आणि तेज मिळत नाही, तसेच जीवनातील संकट आणि अपयश माणसाला अधिक मजबूत बनवतात. जेव्हा तुम्ही अपयशी होता, तेव्हा तुमच्यातील दोष, त्रुटी आणि कमतरता तुम्हाला कळतात. या अडचणी तुम्हाला अधिक चांगले शिकवतात आणि तुम्हाला मोठे यश पेलण्यासाठी तयार करतात. हे संकट म्हणजे तुमच्या कर्माचे शुद्धीकरण असते, ज्यामुळे तुमचा मार्ग निष्कंटक होतो.
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा
अपयशाने खचून जाल तेव्हा पुढील तीन गोष्टी करा :
१. कर्म आणि कर्तव्य: तुमचे वर्तमान कार्य किंवा कर्म निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत राहा. फळाची चिंता करू नका, कारण तुमचे कर्म कधीही व्यर्थ जात नाही.
२. श्रद्धा आणि संयम: हा कठीण काळ लवकरच निघून जाईल, यावर पूर्ण श्रद्धा ठेवा. परमेश्वराने तुमच्यासाठी याहून काहीतरी मोठे आणि चांगले नियोजित केले आहे, म्हणून संयम ठेवा.
३. उपासना आणि नामस्मरण: या कठीण काळात परमेश्वराचे नामस्मरण आणि उपासना वाढवा. महाराजांच्या मते, संवेदनशील काळात केलेली भक्ती अधिक फलदायी ठरते आणि याच भक्तीच्या बळावर तुमचा उद्याचा यशाचा दिवस निश्चित होतो.
म्हणून, वाईट घडणाऱ्या घटनांनी घाबरू नका. धीर धरा, कारण हा काळ लवकरच संपणार आहे. तुमच्या या कठीण काळात तुम्ही केलेली निष्ठा आणि मेहनत, हेच तुमच्या उद्याच्या मोठ्या यशाचा पायारू आहे, हे निश्चित. त्याबरोबरच यशस्वी होण्याचे सूत्र म्हणजे अपयशाने खचू नका आणि यशाने हुरळून जाऊ नका. जी परिस्थिती असेल तिच्याकडे तटस्थ भावनेने बघायला शिका. कारण आज यश असेल तर उद्या अपयश मिळणारच आणि आज अपयश मिळाले असेल तर उद्या यश मिळणारच!