Laxmi Pujan 2025: लक्ष्मीचे स्तोत्र येत नाही? मग 'हे' सोपे श्लोक, मंत्र म्हणत करा लक्ष्मीचे पूजन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 07:05 IST2025-10-21T07:01:01+5:302025-10-21T07:05:02+5:30
Laxmi Pujan 2025: लक्ष्मी पूजन करताना पूजा विधी बरोबरच मंत्रांची जोड असेल तर अधिक लाभ होतो, त्यासाठी पर्यायी हे सोपे श्लोक म्हणा.

Laxmi Pujan 2025: लक्ष्मीचे स्तोत्र येत नाही? मग 'हे' सोपे श्लोक, मंत्र म्हणत करा लक्ष्मीचे पूजन!
पूजेच्या वेळी हाताने पूजाविधी, मुखाने स्तोत्रपठण का करावे? तर मन एकाग्र व्हावे म्हणून! अन्यथा आपण हाताने पूजा करतो, देहाने देवापाशी असतो पण मन आपले सैरभैर असते. त्या मनाला एकाग्र करण्यासाठी स्तोत्रपठण केले जाते. त्यात ईश स्तुती असते. त्या शब्दांमध्ये रममाण होऊन आपले चित्त देवापाशी एकाग्र होते. त्यासाठी श्रीसूक्त, लक्ष्मी सूत्र, अष्टलक्ष्मी स्तोत्र, महालक्ष्मी स्तोत्र, कनकधारा स्तोत्र अशी अनेक प्रभावी स्तोत्र आहेत. पण तुम्हाला ती पाठ नसतील तर काळजी करू नका. पुढील सोपे मंत्र म्हणा आणि मन एकाग्र ठेवून २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दिवाळीतील(Diwali 2025) अत्यंत महत्त्वाची उपासना अर्थात लक्ष्मी पूजन(Laxmi Pujan 2025) करा. लक्ष्मी कृपा अवश्य होईल.
लक्ष्मीचे प्रभावी श्लोक आणि मंत्र
१. श्री महालक्ष्मी अष्टकम् (अत्यंत प्रभावी स्तोत्र) : 'श्री महालक्ष्मी अष्टकम्' हे पद्म पुराणातील स्तोत्र आहे. याचा नित्य जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि घरात स्थिर धन व समृद्धी येते. त्यातील हा श्लोक म्हणा -
श्लोक: नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते॥१॥
(अर्थ: हे महामाये, कमळरूपी आसनावर (श्रीपीठावर) विराजमान झालेल्या आणि देवतांनी पूजलेल्या देवी! हातात शंख, चक्र आणि गदा धारण करणाऱ्या महालक्ष्मी, तुला माझा नमस्कार असो.)
श्लोक: सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि।
सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते॥३॥
(अर्थ: हे सर्व काही जाणणाऱ्या, सर्वांना वरदान देणाऱ्या, सर्व दुष्टांना भयभीत करणाऱ्या आणि सर्व दुःख दूर करणाऱ्या देवी महालक्ष्मी, तुला माझा नमस्कार असो.)
श्लोक: पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि।
परमेशि जगन्मातः महालक्ष्मि नमोऽस्तुते॥७॥
(अर्थ: हे कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या, परब्रह्म स्वरूपिणी देवी! परमेश्वरी, जगन्माते महालक्ष्मी, तुला माझा नमस्कार असो.)
Laxmi Pujan 2025: स्थिर लक्ष्मी हवी? लक्ष्मीपूजन करताना झाडू आणि खडे मीठाने करा 'हा' खास उपाय!
२. करदर्शन श्लोक (सकाळचा महत्त्वाचा श्लोक)
सकाळच्या वेळी उठल्यावर तळहाताचे दर्शन घेऊन हा श्लोक बोलण्याची प्रथा आहे. यालाच कराग्रे वसते लक्ष्मी असे म्हणतात.
श्लोक: कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती।
करमूले तू गोविंदम्, प्रभाते करदर्शनम्॥
(अर्थ: माझ्या हाताच्या पुढील भागात (बोटांवर) लक्ष्मी आणि मध्यभागी सरस्वती (ज्ञान) वास करते. हाताच्या मूळ भागात (मनगटाजवळ) गोविंद (विष्णू) निवास करतात, म्हणून मी सकाळी या तळहातांचे दर्शन घेतो.)
३. महालक्ष्मी बीज मंत्र (धनप्राप्तीसाठी)
बीज मंत्र हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात शक्तिशाली आणि त्वरित फलदायी मानला जातो.
मंत्र: "ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नम:॥"
४. लक्ष्मी गायत्री मंत्र
हा मंत्र सुख, समृद्धी आणि सौभाग्यासाठी जपला जातो.
मंत्र: "ॐ महालक्ष्म्यै च विद्महे। विष्णु पत्न्यै च धीमहि। तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ॥"
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?