मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:10 IST2025-12-17T17:06:58+5:302025-12-17T17:10:17+5:30
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले चार गुरुवार महालक्ष्मी व्रत केले असो वा नसो, शेवटच्या गुरुवारी दिलेला उपाय जरूर करा आणि अष्टलक्ष्मीची कृपा मिळवा!

मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार(Margashirsha Guruvar 2025) हे माता महालक्ष्मीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात. यंदा १८ डिसेंबर २०२५ रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. विशेष म्हणजे, या दिवशी लक्ष्मी-नारायणाचा अत्यंत शुभ योग जुळून येत आहे. अशा स्थितीत महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करण्यापूर्वी घराच्या उंबरठ्यावर एक विशेष उपाय केल्यास साक्षात अष्टलक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल, अशी धार्मिक मान्यता आहे. याबाबत वेदमूर्ती कौस्तुभ जोशी यांनी दिलेला उपाय करून बघा.
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
उंबरठ्याचे महत्त्व आणि लक्ष्मी प्राप्ती
हिंदू धर्मात घराचा उंबरठा हा माता लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानला जातो. ज्या घराचा उंबरठा स्वच्छ आणि सुशोभित असतो, तिथे लक्ष्मी अखंड निवास करते. शेवटच्या गुरुवारी हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख-समृद्धीचे मार्ग मोकळे होतात.
अष्टलक्ष्मी प्रसन्न करण्याचा विशेष उपाय
हा उपाय गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान आणि नित्यकर्म उरकल्यानंतर करायचा आहे.
१. उंबरठ्याचे लेपन: प्रथम थोडे गंगाजल घ्या. जर गंगाजल नसेल, तर शुद्ध पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद मिसळा. या हळदीच्या पाण्याने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याचे मनोभावे लेपन करा. हळद ही मांगल्याचे आणि लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते.
२. शुभ चिन्हांची मांडणी: उंबरठा सुकल्यानंतर, उंबरठ्याच्या दोन्ही कोपऱ्यात कुंकवाने किंवा रांगोळीने 'स्वस्तिक' काढावे. स्वस्तिक हे विघ्नहर्ता गणपती आणि लक्ष्मीचे शुभ चिन्ह आहे.
३. अष्टलक्ष्मीचे 'आठ ठिपके': उंबरठ्याच्या मध्यभागी रांगोळीने किंवा कुंकवाने आठ ठिपके काढा. हे आठ ठिपके माता लक्ष्मीच्या 'अष्ट स्वरूपांचे' (आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि ऐश्वर्यलक्ष्मी) प्रतीक आहेत.
या उपायाचे फळ काय?
लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास: या उपायामुळे अष्टलक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करते आणि स्थिरावते.
आर्थिक अडचणी दूर होतात: लक्ष्मी-नारायण योगामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात आणि अडकलेली कामे पूर्ण होतात.
घरातील नकारात्मकता नष्ट होते: हळद आणि स्वस्तिकमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.
महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनापूर्वी हा छोटासा उपाय नक्की करा. श्रद्धेने केलेल्या या उपायामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच दिसून येतील.
पाहा व्हिडीओ -