Kamika Ekadashi 2023: सर्व मनोकामना पुर्तीसाठी आणि आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी कामिका एकादशीला करा 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 14:38 IST2023-07-12T14:37:24+5:302023-07-12T14:38:14+5:30
Kamika Ekadashi 2023: १३ जुलै रोजी सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामिका एकादशी आहे, त्या दिवशी करा ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय!

Kamika Ekadashi 2023: सर्व मनोकामना पुर्तीसाठी आणि आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी कामिका एकादशीला करा 'हे' उपाय!
सर्व पापकर्मांचा नाश व इच्छित मनोकामना पूर्ण करणारी एकादशी असे या कामिका एकादशीचे महत्त्व आहे. १३ जुलै रोजी कामिका एकादशी आहे. या शुभ मुहूर्ताचा उपयोग आपण कशाप्रकारे करून घेऊ शकतो ते जाणून घेऊ.
एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी! या तिथीला लोक पूर्वसंध्येपासून अर्थात दशमीच्या सायकांळपासून उपास सुरू करतात आणि एकादशीला पूर्ण दिवस उपास करतात. या दिवशी फलाहार करतात. विष्णुसहस्त्रनाम हे स्तोत्र किंवा 'ओम नमो भगवते वासुदेवाय'' हा मंत्र म्हणत उपासना करतात. असा उपास व उपासना केल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे कालानुकाळ एकादशीचे व्रत भाविक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करत आहेत.
याशिवाय आर्थिक अडचणीतून मुक्त होण्यासाठी पुढील उपाय करा
>> जर तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने दबले जात असाल तर पिंपळाच्या झाडाला एक कलशभर पाणी अर्पण करा. तसेच पिंपळाच्या झाडाला ११ वेळा प्रदक्षिणा घालून धागा बांधावा आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा मंत्र म्हणावा. याचा फायदा होईल.
>> व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करिअरला नवी दिशा मिळण्यासाठी पिंपळाचे पान घ्या आणि त्यावर कुंकवाऐवजी हळदीचे स्वस्तिक बनवा. ते पान एखाद्या मंदिरात झाडाच्या बुंध्याशी ठेवून द्या. केळ्याचा नैवेद्य दाखवून गरजू व्यक्तीला केळीचे दान करा.
>> कष्ट करूनही व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल, तर एकादशीचा उपास करून भगवान विष्णूंची पूजा करावी. उपास शक्य नसेल तर विष्णू सहस्त्र नामाचे पठण करावे किंवा श्रवण करावे.
>> घरातील सदस्यांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होत असतील तर या दिवशी देवघरातील शंखामध्ये थोडे गंगाजल किंवा कलशातले साधे पाणी भरून भगवान विष्णूला अर्पण करावे. त्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. त्यानंतर हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे त्यामुळे गृहकलह मिटतात.