शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

kamada Ekadashi 2024: कामदा अर्थात इच्छापूर्ती करणारी एकादशी; या तिथीला कर्जुमुक्तीसाठी करा दिलेले उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 07:00 IST

Kamada Ekadashi 2024: १९ एप्रिल रोजी कामदा एकादशी आहे, त्यादिवशी विष्णू उपासनेत ज्योतिष शास्त्राने दिलेल्या उपायांची भर घाला, कर्जमुक्तीस हातभार लागेल!

पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा एकादशीचे व्रत केले जाते. या व्रतामध्ये भगवान विष्णूची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी मनोभावे पूजा केल्याने भगवान विष्णुकृपा प्राप्त होते आणि प्रत्येक इच्छापूर्ती देखील होते.अविवाहितांसाठीदेखील हे व्रत महत्त्वपूर्ण मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी पुढील उपास केल्यास कर्जमुक्तीसही हातभार लागतो असे म्हणतात. त्यामुळे इप्सित मनोकामनापूर्तीसाठी विष्णूंची पूजा, उपासना करावी आणि कर्जमुक्तीसाठी पुढील उपाय करावेत. 

कामदा एकादशीला हे उपाय करा

>> जर तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याने दबले जात असाल तर पिंपळाच्या झाडाला एक कलशभर पाणी अर्पण करा. तसेच पिंपळाच्या झाडाला ११ वेळा प्रदक्षिणा घालून धागा बांधावा आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' हा मंत्र म्हणावा. याचा फायदा होईल. 

>> व्यवसाय वाढवण्यासाठी आणि करिअरला नवी दिशा मिळण्यासाठी पिंपळाचे पान घ्या आणि त्यावर कुंकवाऐवजी हळदीचे स्वस्तिक बनवा. ते पान एखाद्या मंदिरात झाडाच्या बुंध्याशी ठेवून द्या. केळ्याचा नैवेद्य दाखवून गरजू व्यक्तीला केळीचे दान करा. 

>> कष्ट करूनही व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल, तर एकादशीचा उपास करून भगवान विष्णूंची पूजा करावी. उपास शक्य नसेल तर विष्णू सहस्त्र नामाचे पठण करावे किंवा श्रवण करावे. 

>> घरातील सदस्यांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होत असतील तर या दिवशी देवघरातील शंखामध्ये थोडे गंगाजल किंवा कलशातले साधे पाणी भरून भगवान विष्णूला अर्पण करावे. त्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी. त्यानंतर हे पाणी घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडावे त्यामुळे गृहकलह मिटतात. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Astrologyफलज्योतिष