शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:16 IST

Janmashtami 2025 Husband Wife Relationship Tips: प्रत्येक जोडपे राधा-कृष्णाला आपला आदर्श मानते, पण त्यांच्यासारखे नाते फुलत नसेल तर दिलेल्या वास्तू टिप्स वापरायला हव्यात.

नवरा बायकोचे नाते अतिशय नाजूक. दोन कुटुंबातून आलेल्या दोन व्यक्तींचे परस्परांशी पटणे, पटवून घेणे आणि एकमेकांना समजून घेणे यात बराच कालावधी लागतो. तोवर श्रद्धा आणि सबुरी बाळगावी लागते. तसे न केल्यास नाते विकोपाला जाते. परंतु दोघांमध्ये प्रेम हा जोडणारा धागा मजबूत असेल, तर कितीही भांडणे होवोत पण 'तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना' अशी स्थिती होते. राधाकृष्णासारखे हे प्रेम अधिक वृद्धिंन्गत व्हावे, यासाठी गोकुळाष्टमीच्या(Janmashtami 2025) मुहूर्तावर अर्थात १५ ऑगस्ट रोजी  रोजी शास्त्रात दिलेले उपाय अवश्य करून पहा. 

Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!

>> पितृदोषाने जर घरामध्ये कलह होत असेल तर सर्वप्रथम पितृदोषाचे निरसन करावे. कुलदेवतेच्या दोषाने कलह होत असेल तर कुलदेवतेच्या दोषाचे निरसन करावे. वास्तुदोषाने कलह होत असेल तर वास्तुदोषाचे निरसन करावे.

>> अनिष्ट ग्रहांमुळे पती पत्नींमध्ये भांडणे होत असल्यास त्या ग्रहाचे जप, होमहवन, दानधर्म करावे. श्रीगुरुचरित्र, स्वामीचरित्र, कलियुगाचे इच्छितदाता, साईचरित्र, श्री गुरुलिलामृत किंवा सत्पुरुषांचे चरित्र वाचन करावे.

>> भांडणे घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या जोडप्याने  किंवा दोघांपैकी एकाला घटस्फोट घेण्याची इच्छा असल्यास खालील संकल्प करून एकनाथ महाराजलिखित रुक्मिणी स्वयंवराचे पारायण करावे. संकल्प अशा पद्धतीने करावा-

मम वैवाहिक जीवन कर्माणि उत्पन्नांना विविध प्रत्यवायांनासमूल परिहारपूर्वक पुन: मिलन सिद्धी द्वारा अद्यारंभ करिष्ये।।

हा श्लोक म्हणून श्रद्धापूर्व रुक्मिणी स्वयंवर वाचावे. पूर्ण पोथी शक्य नसेल, तर रोज किमान एक अध्याय तरी जरूर वाचावा.

>> दोघांनी किंवा दोघांपैकी एकाने सोळा सोमवारचे व्रत करावे. सोमवारी संधीकाळात, सोमप्रदोषकाळात आणि शिवरात्रीला शिवमंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करून कणकेचा साजुकतुपाचा दिवा लावून एक मूठ नागकेशर शिवपिंडीवर अर्पण करावे.

चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!

>> काही वेळा स्त्रीचा काहीही दोष नसताना तिचा पती दुसऱ्याच्या नादी लागून त्यांच्या प्रपंचात काडीमोड घेत असेल, सतत भांडणे होऊन दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असेल तर स्वामी समर्थांची उपासना करावी. तसेच अशा बाबतीत श्रीकृष्णाची उपासनाही फलदायी ठरते. ''ओम नमो भगवते वासुदेवाय'', हा मंत्र जप किंवा विष्णुसहस्त्रनाम पठण करावे. त्याचा निश्चित परिणाम होतो. ही उपासना शीघ्रफलदायी असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. कारण श्रीकृष्ण हा स्त्रीभोक्ता नसून स्त्रीरक्षणकर्ता आहे.

या सर्व उपासनेबरोरबर नात्यात प्रेम असावे, एकमेकांना समजून घेण्याची तयारी आणि राधा कृष्णाचा आदर्श ठेवला तर तुमच्या उपासनेला नक्कीच फळ येईन आणि नाते काडीमोड होण्याच्या उंबरठ्यावरून परत येईल!

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीVastu shastraवास्तुशास्त्रTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणLord Krishnaभगवान श्रीकृष्णRelationship Tipsरिलेशनशिप