शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:27 IST

Krishna Navratri 2025 Start Date: गोकुळाष्टमीच्या उत्सवाबद्दल आपल्याला माहीत आहेच, पण हा उत्सव नऊ दिवसांचा असतो हे माहीत आहे का? सविस्तर जाणून घ्या.

आपण देवीची नवरात्र ऐकली आहे, रामाची नवरात्र ऐकली आहे, खंडोबाची नवरात्र ऐकली आहे, पण श्रीकृष्णाचीही नवरात्र असते, हे अनेकांनी प्राथमच ऐकले असेल. याचे कारण एकच, की कालौघात अनेक व्रत कालबाह्य झाल्यामुळे आपल्याला त्याबद्दल पुरेशी माहिती नाही. श्रीकृष्ण नवरात्र आपल्यासाठी नवीन असली, तरी कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला होतो व दुसऱ्या दिवशी हंडी फोडून काला करून उत्सवाची सांगता होते, हे तर आपल्याला माहीत आहेच! याचाच पूर्वार्ध म्हणजे श्रीकृष्णाची नवरात्र! श्रावण वद्य प्रतिपदा ते नवमी हा उत्सव असतो. यंदा श्रीकृष्ण नवरात्रीचा उत्सव १० ऑगस्ट रोजी सुरू झाला असून १६ ऑगस्ट रोजी रोजी त्याची सांगता होईल. तर कृष्ण जन्मोत्सव १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. 

Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!

गोकुळाष्टमीचा (Janmashtami 2025) उत्सव कथा कीर्तनाने आठ दिवस आधी सुरू होऊन अष्टमीला कृष्णजन्म आणि नवमीला काल्याचे कीर्तन होत असे. आजही काही मंदिरांमध्ये चातुर्मासाची, श्रावण महिन्याची नाहीतर अष्टमीतल्या सप्ताहाची कीर्तने आयोजित केली जातात. त्या कीर्तनांमधून या नवरात्रीबद्दल तसेच या उत्सवाबद्दल सविस्तर माहिती कळते. आता जेमतेम उत्सवाची कीर्तनं होतात आणि हंडीसाठी लोक उत्सुक असतात. त्यामुळे माहितीचा स्रोत आटून गेला. यासाठीच लोकमत भक्तीच्या माध्यमातून व्रत वैकल्यांना, उत्सव, परंपरेला पुनरुज्जीवन देण्याचा अल्प प्रयत्न!

गोकुळाष्टमी नवरात्र- श्रावण प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हे नवरात्र करतात. मात्र ते महाराष्ट्रात अधिककरून देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांच्या घरी काही कुळांमध्ये करण्याची प्रथा आहे. या नवरात्रात भागवत सप्ताह केला जातो. ते शक्य नसल्यास भागवताच्या एखाद्या स्कंधाचे या पठण श्रवण केले जाते. अथवा अखंड नामसप्ताह, कीर्तनाचे आयोजन केले जाते. अनेक कृष्ण मंदिरात तसेच विठ्ठल मंदिरातही हे नवरात्र उत्साहाने साजरे होते. याची समाप्ती गोपाळकाल्याने होते. भंडारा मात्र बहुतेक ठिकाणी असतो.

पूर्वापार हे व्रत फक्त काही कुळांपुरतेच मर्यादित आहे. परंतु अलिकडे कृष्णभक्ती करणारे अनेक भाविक हे व्रत करतात. सध्याच्या धवापळीच्या काळात भागवत सप्ताह करणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. परंतु सामुहिक पद्धतीने एकत्र होऊन सप्ताहाचे आयोजन केले, तर तेही निश्चित जमू शकते. 

Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!

असे कार्यक्रम विधीचा, पूजेचा एक भाग किंवा सोपस्कार नाही, तर या गोष्टी आपल्या मनाला प्रसन्नता, उभारी देण्यासाठी आहेत. या निमित्ताने समाजाचे एकत्रीकरण होते, अंतर्गत मतभेद दूर होतात, भांडण मिटून स्नेहभोजन होते. गप्पा रंगतात. यांत्रिक युगात जगत असलेल्या मानवाला चार घटका माणसांचा सहवास मिळतो आणि माणूस खऱ्या अर्थाने माणसाळतो. 

अशा संधी न दवडता, निमित्त शोधून संघटित होण्याची गरज आहे. ही एकजूट सणाच्या निमित्ताने झाली, तरच संकटप्रसंगीदेखील कामी येईल. लोकमान्यांनी हेच तंत्र वापरून गणेश उत्सव आणि शिवजयंतीला सार्वजनिक रूप दिले. पुन्हा एकदा काळाची गरज ओळखून आजच्या मोबाईलयुगात स्वत:ला आणि इतरांना अशा कार्यासाठी एकत्र करणे गरजेचे आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना हातभार लागेल, स्थानिकांना रोजगार मिळेला, मुलांना वृद्धांना विरंगुळा मिळेल आणि पुढच्या पिढीच्या हाती नकळत संस्कृतीचे हस्तांतरण होईल.

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीNavratriनवरात्रीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणLord Krishnaभगवान श्रीकृष्ण