इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 12:24 IST2025-09-16T12:23:50+5:302025-09-16T12:24:42+5:30
Indira Ekadashi 2025: १७ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी आहे, पितृपक्षात आलेली ही एकादशी का महत्त्वाची आहे आणि त्यादिवशी तुळशीचे कोणते नियम पाळायचे ते वाचा.

इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी. दर महिन्यात ती दोनदा येते. दर एकादशीचे महत्त्वही आगळे वेगळे आहे. त्याचप्रमाणे १७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या इंदिरा एकादशीचे(Indira Ekadashi 2025) महत्त्व जाणून घेऊया.
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
इंदिरा एकादशीचे महत्त्व :
पितृपक्ष(Pitru Paksha 2025) हा पितरांच्या श्राद्धासाठी राखीव ठेवलेला असतो. या कालावधीत पितर आपल्या वंशजांची भेट घेण्यासाठी कोणत्या न कोणत्या स्वरुपात पृथ्वीवर अवतीर्ण होतात, अशी पूर्वापार श्रद्धा आहे. त्यांच्याप्रती ऋणनिर्देशन म्हणून श्राद्धविधी केला जातो. त्यामुळे पितर तृप्त होऊन वंशजांना भरभरून आशीर्वाद देतात. अशा या पुण्यसमयी एकादशीच्या व्रताची भर पडली तर दुग्दशर्करा योगच म्हटले पाहिजे.
इंदिरा एकादशी पूजा आणि श्राद्धविधी:
इंदिरा एकादशीच्या दिवशी, पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपासना आणि पूजा केली जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष असतो, त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे. त्यामुळे पितृदोष दूर होऊन पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पुढील पिढीला कसलीही बाधा येत नाही. या दिवशी आपला उपास असला, परंतु पितरांची तिथ असेल तर पितरांना उपाशी ठेवू नये, तर श्राद्धाचा नैवेद्य करावा, काकबली वाढावा, गायीला, कुत्र्याला पान वाढावे आणि आपण एकादशीचा उपास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला कृष्णाला किंवा भगवान विष्णूंना फुल वाहून नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा.
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
इंदिरा एकादशीची पौराणिक कथा :
इंदिरा एकादशीच्या दिवशी पवित्र राजा इंद्रसेनने पितृ लोकात आपल्या वडिलांच्या उद्धारासाठी उपवास व पूजा केली होती. यामुळे त्यांना वैकुंठ लोक प्राप्त झाले. तेव्हापासून इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपास आणि पूजा करण्याचा नियम आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष आहे, त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे. पंचांगानुसार, या वर्षी इंदिरा एकादशीचा उपवास ०२ ऑक्टोबर, शनिवारी ठेवला जाईल. इंदिरा एकादशीच्या उपास आणि उपासनेची पद्धत जाणून घेऊया...
उपवास पद्धत :
इंदिरा एकादशीचे व्रत पितृ पक्षात येत आहे आणि त्याचा उपवास विशेषतः एखाद्याच्या मृत पूर्वजांच्या, पूर्वजांच्या उद्धारासाठी साजरा केला जातो. म्हणून इंदिरा एकादशीला इतर एकादशीच्या उपवासात विशेष स्थान आहे. त्याचे पारण द्वादशीच्या दिवशी केले जाते. इंदिरा एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न घ्यावे. एकादशीच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. वरचेवर फराळ न करता ठराविक वेळी फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्न दान करून उपास सोडावा.
षडाष्टक योग २०२५: १८ सप्टेंबर शनी-शुक्र अशुभ षडाष्टक; ५ राशींचे आर्थिक, मानसिक आरोग्य धोक्यात
इंदिरा एकादशी विशेष तुळशी नियम :
>> एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत अशी प्रचलित धारणा आहे, तर शास्त्रांमध्ये असे नमूद आहे की तुळशीची पाने तोडणे फक्त रविवार आणि एकादशीला निषिद्ध आहे. अशा परिस्थितीत, इंदिरा एकादशीला भगवान विष्णूला अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने तोडता येतात, परंतु फक्त ब्रह्म मुहूर्तावर.
>> इंदिरा एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नये. तुळशीमाता देखील एकादशीला उपवास करते, म्हणून तिला पाणी अर्पण केल्याने तिचा उपवास मोडू शकतो अशी त्यामागे भावना असते. पूजा करताना, तुम्ही फक्त तुळशीच्या रोपावर दिवा लावू शकता आणि त्याची प्रदक्षिणा करू शकता. हा नियम इंदिरासह सर्व एकादशींसाठी वैध आहे.
>> इंदिरा एकादशी पितृपक्षात येते. अशा परिस्थितीत या दिवशी पूर्वजांना अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने वापरू नयेत. याशिवाय, सामान्य दिवशी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावला जातो, तर इंदिरा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ काळ्या तिळाचा दिवा लावावा. यामुळे पूर्वजांना शांती मिळते.
इंदिरा एकादशीला तुळशीचे हे तीन नियम पाळल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि घरात सकारात्मकता टिकून राहते. आणखी एक गोष्ट आहे जी तुम्ही उपाय म्हणून केली तर तुम्हाला फायदा होईल. इंदिरा एकादशीला तुळशीच्या रोपासमोर उभे राहून तुळशी चालीसा पठण करा. यामुळे संपत्ती वाढेल.