शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

लोकल, बस प्रवासात स्तोत्रवाचन करणे कितपत योग्य आहे? त्याला शास्त्राधार आहे का पाहा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 10:08 IST

नाममंत्राचा जप, सोऽहं जप व प्राकृत पोथ्यांचे वाचन कोणत्याही ठिकाणी करता येते. गाडीत वाचन करण्यासारखी परिस्थिती असेल तर अवश्य वाचन करावे.

धर्मसिंधुसारख्या धर्मग्रंथातही वरील प्रश्नाचा उहापोह केलेला आढळत नाही. कारण धर्मशास्त्रग्रंथाची निर्मिती झाली त्यावेळची परिस्थिती एकदम निराळी होती. प्रत्येकजण देवपूजा, वाचन, जपजाप्य यासाठी सकाळचा वेळ काढून ठेवत असे. लोकसंख्येच्या भरमसाठी वाढीमुळे आता फक्त जगण्यासाठी झगडणे एवढेच बहुसंख्य लोकांच्या हातात राहिले आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन हा मोठा प्रश्न उद्भवल्यामुळे जपजाप्य कधी करायचे, हा देखील प्रश्न उद्भवला आहे. 'शास्त्र काय सांगते' या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार आपण या प्रश्नाचे उत्तर शोधूया. 

सद्यस्थितीत वाईटात एकच गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे देवाधर्माविषयी बुद्धी व ईश्वराविषयी आस्तिक्यभाव दिवसेंदिव वाढत आहे. त्यामुळे मिळेल त्या थोड्या वेळात काही तरी करावे असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे. अशा वेळी मग नाना प्रश्न उद्भवतात. घरी तर श्वास घेण्याइतकी फुरसत मिळत नाही. मग फक्त प्रवासात मिळणारा वेळ सत्कारणी लावता येईल का? या थोड्याशा वेळात एखादी पोथी वाचावयास काय हरकत आहे? हे प्रश्न रास्त आहेत. फक्त शास्त्राधार मिळाला की हे प्रश्न सुटू शकतात. 

फोटो सौजन्य : गुगल

पण त्यासाठी गहन काथ्याकुट करण्याची काहीच आवश्यकता नाही. थोडेसे शास्त्र माहित असले तरी चालते. वैदिक मंत्र, बीजमंत्र, तांत्रिक तंत्र, मालामंत्र इ. मंत्रांचे पुरश्चरण घरात एकाच जागी बसून करावे लागते. त्याचप्रमाणे वैदिक सूक्ते व तत्सम गुरुचरित्रासारखे महाप्रभावी प्रसादिक ग्रंथही एकाच जागी बसून वाचावे लागतात. पण नाममंत्राचा जप, सोऽहं जप व प्राकृत पोथ्यांचे वाचन कोणत्याही ठिकाणी करता येते. विशेषत: वैखरी वाणीने म्हणजे मोठ्याने केलेल्या जपाचा कालांतराने मध्यमेत म्हणजे पुटपुटण्यात प्रवेश होतो. कालांतराने तो परेला भिडतो. परावाणी म्हणजे मानसिक जप होय. ज्यावेळी थोडा निवांत वेळ मिळेल त्यावेळी परावाणीने अवश्य जप करावा. परावाणीने नाही तर किमान मनातल्या मनात जप करावा. 

गाडीत वाचन करण्यासारखी परिस्थिती असेल तर अवश्य वाचन करावे. हल्ली दररोज प्रवास करणारे लोक आपले आह्निक गाडीतच उरकतात. घरात फक्त देवपूजा होते. रिकाम्या वेळेत डोक्यात व्यावहारिक व प्रपंचाचे विचार आणून मन:शांती बिघडवून घेण्यापेक्षा सरळ प्राकृत ग्रंथांचे वाचन करावे. ज्यावेळी मनात अमंगळ भावना निर्माण होण्यासारखी स्थिती असते किंवा एखादे वाईट दृष्य दिसून मन विचलित होते, तेव्हा हातपाय धुवून आचमन करावे. 

प्रवासात आचमनासाठी पळीभांडे, ताम्हण यांची आवश्यकता नसते. उजव्या कानाला हाताने स्पर्श करणे हेदेखील श्रोत्राचमन होय. हे शुद्ध भावनेने करावे. तसे करून 'आपण शुद्ध आहोत' अशी तीव्र भावना करून आपले नेहमीचे वाचन, मनन, चिंतन, जप इ. आह्निक करावे. मुंबई पुणे सारख्या शहरातले लोक लोकल ट्रेन, बसमध्ये धर्माचरण करतात. ज्यावेळी एखादी प्राकृत पोथी तोंडपाठ होते, त्यावेळी हातात पुस्तक घेण्याचीही गरज लागत नाही. थोड्या सरावाने आपले नित्यकर्म करूनही नामस्मरण व मनोमन स्तोत्रपठण केल्याचे फलही मिळते. थोड्याशा सवयीने मनात नामस्मरण व देहाने प्रपंचा या गोष्टीतून सहज सुलभ होतात.  प्रवासात जप करायचा असेल, तर जपमाळेचा वापर केला असता ते प्रदर्शनीय ठरेल. अशा वेळी बोटावरील पेरांचा वापर करावा. नाम होईल आणि काम पण होईल, नाही का? शेवटी तुकाराम महाराज म्हणतात तेच खरं... 

नलगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा।।

अर्थात, जिथे असाल तिथे मनापासून देवाचा धावा करा, तुमची हाक त्याच्यापर्यंत पोहोचतेच!

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल