Holika Dahan 2025: होलिका दहनानंतर चिमूटभर राख घरी आणा; दारिद्र्य, रोगराईला रामराम म्हणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 09:43 IST2025-03-12T09:43:01+5:302025-03-12T09:43:36+5:30

Holika Dahan 2025: होलिका दहन झाल्यावर त्यातली रक्षा आपण कपाळावर लावतो, पण ज्योतिष शास्त्रात त्या रक्षेचा खूप मोठा लाभ सांगितला आहे, तो करून घ्या!

Holika Dahan 2025: Bring a pinch of ash home after Holika Dahan; Say goodbye to poverty, disease! | Holika Dahan 2025: होलिका दहनानंतर चिमूटभर राख घरी आणा; दारिद्र्य, रोगराईला रामराम म्हणा!

Holika Dahan 2025: होलिका दहनानंतर चिमूटभर राख घरी आणा; दारिद्र्य, रोगराईला रामराम म्हणा!

होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते. मराठी वर्षाच्या सांगतेला येणारा मोठा सण म्हणजे होळी. मार्च महिन्यात होळी आहे. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. होळीचा दुसरा दिवस धूलिवंदनाचा. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. यंदा १३मार्च २०२५ रोजी होळी (Holi 2025) म्हणजेच होलिका पूजन, दहन (Holika Dahan 2025) असून, १४ मार्च रोजी धुलिवंदन (Dhulivandan 2025) आहे.

Holika Dahan 2025: होलिका दहनाच्या वेळी का अर्पण केला जातो पिठाचा दिवा? जाणून घ्या विधी आणि लाभ!

यंदाची होळी खूप खास आहे : 

होळी हा मराठी वर्षातील शेवटचा सण. सन २०२५ रोजी होळीला चंद्रग्रहण लागणार आहे. मात्र, हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जाते. काही मान्यतांनुसार, होळीच्या दिवशी चंद्रग्रहण हा योग १०० वर्षांनी जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे.

या मुहूर्तावर होळीच्या रक्षेचा असा करा उपयोग :  

रंग, आनंद आणि आनंदासोबतच वाईट वृत्तीवर विजयाचा सण आहे. होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो. जीवनात सकारात्मकता आणि सुख-समृद्धी येण्याच्या दृष्टीनेही होळीचा सण खूप खास आहे. ही सकारात्मकता आयुष्यात उतरावी म्हणून होळीची रक्षा/ राख आपण श्रद्धेने कपाळाला लावतो. ही रक्षा लावण्याचे ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, जे खूप प्रभावी आहेत. ते जाणून घेऊ. 

होलिका भस्म कसे धारण कराल?

आर्थिक संकट दूर करण्याचा उपाय - आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेची भस्म लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. तसेच त्या राखेची छोटीशी पुडी बनवू शकता आणि आपल्या पर्समध्ये ठेवू शकता. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होऊ लागेल.

कामात यश मिळवण्यासाठी - कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी होलिकेच्या भस्म करा, असे केल्याने कार्यात यश मिळते.

घरामध्ये सुख-शांती आणण्यासाठी उपाय - होलिकेचे भस्म एका डबीत ठेवा आणि शुभ मुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात चिमूटभर टाका, यामुळे घरातील भांडणे संपतील आणि सुख-शांती नांदेल.

घराचे वाईट शक्तीपासून रक्षणासाठी - घरातील एखादा सदस्य सतत आजारी असेल किंवा एखादे लहान मूल वारंवार आजारी पडत असेल तर होलिकेचे भस्म एका कपड्यात बांधून संबंधित व्यक्तीच्या उशाशी ठेवावे किंवा त्या व्यक्तीच्या कपाळाला लावावी, लवकरच फरक दिसून येईल

Holika Dahan 2025: होलिका राक्षसीण असूनही तिला मातेचा दर्जा आणि पूजनही; पण का? वाचा गर्भितार्थ!

Web Title: Holika Dahan 2025: Bring a pinch of ash home after Holika Dahan; Say goodbye to poverty, disease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.