Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:45 IST2025-11-07T16:44:43+5:302025-11-07T16:45:41+5:30
Hanuman Upasana, Hanuman Mantra for Success: दिवसाची सुरुवात कशी होते, यावर पूर्ण दिवस कसा जाणार हे अवलंबून असते; दिवस यशस्वी घालवायचा असेल तर हा मंत्र जाणून घ्या.

Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
श्लोक, मंत्र यांच्यात प्रचंड ताकद असते. मात्र ते केवळ पाठ आहेत म्हणून म्हणण्यात अर्थ नाही. त्या शब्दांकडे लक्ष देत जाणीवपूर्वक, एकाग्रतेने हे मंत्र म्हटले असता लाभ होतो, असा भाविकांचा अनुभव आहे. दिवसाच्या सुरुवातीला कोणता श्लोक, मंत्र म्हणावा ते जाणून घेऊ.
Sankashti Chaturthi 2025: अशांत मन, निर्णयक्षमतेचा अभाव, नैराश्य यावर उपाय म्हणजे 'ही' गणेश उपासना!
मंगळवार, शनिवार हा हनुमंताच्या उपासनेचा. याचा अर्थ इतर दिवशी त्याची उपासना करायची नाही का? तर असे नाही! प्रत्येक देवतेचा वार ठरवून देण्यामागचे कारण म्हणजे त्या त्या दिवशी त्या देवाची आठवण काढून त्यांचे स्मरण, पूजन करावे. काही उपासना दैनंदिन स्वरूपाच्या असतात. जसे की सकाळी उठल्यावर दोन्ही हातांचे तळवे पाहून लक्ष्मी, विष्णू, सरस्वती यांचे स्मरण करत,
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम् ॥
हा श्लोक म्हणावा. त्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्याआधी तिला स्पर्श करून नमस्कार करत,
समुद्रवसने देवी पर्वतस्थानमंडले ।
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥
असे म्हणत तिची क्षमा मागावी. त्यानंतर अंघोळ करताना गंगेचे स्मरण, अंघोळ झाल्यावर अथर्वशीर्ष, भगवद्गीतेचे अध्याय, संध्याकाळी रामरक्षा, मारुती स्तोत्र म्हणावे आणि रात्री झोपण्याआधी,
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥
हा श्लोक म्हणत श्रीकृष्णाला अनन्य भावे शरण जात आपला दिवसभराचा थकवा, तणाव, तक्रारी त्याच्या पायाशी अर्पण करून आपला योगक्षेम त्याने चालवावा अशी विनंती करावी आणि झोपी जावे.
Samudra Shastra: दातात फट असणारे श्रीमंत असतात? दाताच्या ठेवणीवरून वाचा भाकीत!
याबरोबरच आणखी एक मंत्र महत्त्वाचा ....
संत तुलसीदास यांनी रचलेली 'हनुमान चालीसा' रोज म्हणत असाल तर उत्तमच आहे. पण सकाळी झोपून उठल्यावर दिवसभरातली कामं सुरु करण्याआधी अंथरुणावर बसूनच 'ओम हनुमतये नमः' हा मंत्र जितक्या वेळा शक्य तितक्या वेळा म्हणावा. त्यासाठी हातात जपमाळ घेण्याची गरज नाही. केवळ मनापासून हा मंत्र म्हणणे अपेक्षित आहे. या मंत्राची ताकद अशी की हनुमंताला आपले गाऱ्हाणे एकवेच लागते. त्यासाठी हाक मनापासून मारावी लागते हेही तेवढेच खरे आहे.
२१ दिवसांत परिणाम :
हा मंत्र सलग २१ दिवस सकाळी झोपून उठल्यावर आठवणीने म्हटला तर तुम्हाला तुमच्या अडचणीतून नक्कीच मार्ग सापडेल. यासाठी झोपून उठल्यावर हा नामजप मनातल्या मनात सुरु करा.
(सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.)