शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Hanuman Jayanti 2025: पहिल्यांदा सूर्यनमस्कार कोणी आणि कधी घातला? जाणून घ्या लोककथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:56 IST

Hanuman Jayanti 2025: तरुणांसमोर भक्ती, शक्ती आणि युक्तीचा आदर्श राहावा म्हणून समर्थांनी वीर मारुतीची स्थापना केली, तोच सूर्यनमस्काराचा उद्गाता कसा ते पाहू.  

>> योगेश काटे, नांदेड 

रामनवमीतचा उत्सव झाला की  हनुमान जयंतीचे वेध लागतात. हनुमंतराय म्हणजे  बुद्धीमतं वरीष्ठम्  असे आहेत वा.रामायणात तसे विविध रामायणात हनुमंताच्या पराक्रमाची गाथा लिहिले आहे तर संतांनी ती गाईला आहे.  समर्थ रामदास स्वामी व तुसलीदास यांनी तर गाईलीईच  पण ज्ञानोबराय, तुकाराम महाराज, एकनाथ महाराजांनी पण अनेक ठिकाणी हनुमंताच्या भक्ती शक्ती चे गुणवर्णन केले आहे.आज अशीच लोकाख्याईका आज लिहिणार आहे. 

Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती की जन्मोत्सव? दरवर्षीचा वाद; त्यावर दाते पंचांगाचा खुलासा!

मारोतीराय  जन्मल्या जन्मल्या  सुर्याकडे झेप घेतली  ते लाल फळ पाहिजे म्हणुन! ही घटना आपणा सर्वांना माहिती आहेच. इंद्राने वज्राचा प्रहार करत हनुमंतास बेशुद्ध केले हे आपल्याला माहिती आहे. पुढे अंजनीपुत्र  मारोतीराय  वेदशास्त्र संगीत शस्त्रास्त्राचे शिक्षण घेण्यासाठी भगवान सुर्यनारायणकडे गेले आणि सर्व शास्त्रात पारंगत झाले, त्यानंतर पुढे गुरुदक्षिणा देण्याचा दिवस आला  काय बरं  व कोणती गुरुदक्षिण दिली असेल  हनुमंताने? तर सूर्यनारायणास  हनुमंताने जी गुरुदक्षिणा ती जगास संजीवनी ठरली  ती दक्षिणा म्हणजे सूर्यनमस्कार! सूर्याची बारा नावे घेऊन योग आसनात घातलेले नमस्कार सूर्यनमस्कार म्हणून ओळखले जाऊ लागले. 

हनुमंताने सुर्यनारायणास सुर्यनमस्कार घालून अद्भुत अशी गुरुदक्षिणा दिली असं म्हणतात. सूर्यनमस्काराचे उगमकर्ता हनुमंतच आहेत म्हणून त्यांना बुद्धी, बल, तेज, उत्तम आयु, आरोग्य, सर्वकाही प्राप्त झाले आहे. 

मानसशास्त्राचा नियम आहे, मानव ज्याचे चिंतन करतो, तसा तो होतो. आपल्या पूर्वजांनी सहस्त्र रश्मिची उपासना केली आणि स्वत:चे जीवन तेजस्वी तसेच प्रतिभासंपन्न बनवले. आपलेही जीवन तेजोमय व्हावे वाटत असेल, तर तत्काळ सूर्योपासना सुरू करा आणि फरक अनुभवा. सुरुवात एका सूर्यनमस्काराने करा, हरकत नाही. पण सुरुवात करा आणि रोज एक नमस्कार घालत त्यात भर घाला आणि मारुती रायासारखे आरोग्य संपन्न व्हा!

यंदा १२ एप्रिल २०२५ रोजी हनुमान जयंती आहे, त्यानिमित्ताने आपणही बलोपासनेची सुरुवात करूया. रोज सूर्यनमस्कार घालूया आणि आनंदी, निरोगी, दीर्घायुषी होऊया. 

Chaitra Purnima 2025: इंग्रजी माध्यमातल्या मुलांना मराठी महिने आणि सण यांची ओळख करून देण्याची सोपी पद्धत!

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीFitness Tipsफिटनेस टिप्स