Hanuman Jayanti 2025: राहू-केतूची अशांती मागे लागू नये म्हणून हनुमान जयंतीला तुळशीचे रोप आणा व दान करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:00 IST2025-04-10T16:00:11+5:302025-04-10T16:00:33+5:30

Hanuman Jayanti 2025: हनुमान जन्मोत्सवाला तुळशीचे दान आणि पूजन केले जाते; मात्र हनुमान आणि तुळशी काय आहे परस्पर संबंध? जाणून घ्या!

Hanuman Jayanti 2025: Bring and donate a Tulsi plant on Hanuman Jayanti to avoid the unrest of Rahu-Ketu! | Hanuman Jayanti 2025: राहू-केतूची अशांती मागे लागू नये म्हणून हनुमान जयंतीला तुळशीचे रोप आणा व दान करा!

Hanuman Jayanti 2025: राहू-केतूची अशांती मागे लागू नये म्हणून हनुमान जयंतीला तुळशीचे रोप आणा व दान करा!

चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. या वर्षी हनुमान जन्मोत्सव १२ एप्रिल रोजी शनिवारी आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी, हनुमानाची पूजा केली जाते, रुईच्या पानाफुलांचा हार वाहिला जातो, त्याचप्रमाणे या दिवशी तुळशीचे दान करणे देखील शुभ मानले जाते. हे रोप दान केल्यामुळे तुमचे कुंडली दोष दूर होऊन तुम्हाला करिअर तसेच व्यक्तिगत आयुष्यात बरीच प्रगती अनुभवता येते असे ज्योतिष शास्त्र सांगते. 

Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती की जन्मोत्सव? दरवर्षीचा वाद; त्यावर दाते पंचांगाचा खुलासा!

हनुमान जयंतीला तुळशी दान करण्याचे महत्त्व आणि फायदे : 

तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि ती भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. आणि श्रीराम हे विष्णूंचे अवतार, तर हनुमान हे रामाचे भक्त! ही साखळी पाहता हनुमान हे अप्रत्यक्षरीत्या विष्णू आणि लक्ष्मीचे भक्त आहेत. जिथे लक्ष्मी तिथे विष्णू आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी, या नियमाप्रमाणे विष्णूंचे पाय आपल्या घरी लागावेत म्हणून त्यांची पत्नी जी तुळशीचे रूप आहे ती सन्मानाने घरी आणावी, पुजावी आणि प्रार्थना करावी. 

हनुमान जयंतीला तुळशीचे दान केल्याने व्यक्तीला अखंड भक्ती, धैर्य, आरोग्य आणि मानसिक शांती मिळते. हनुमान जयंतीच्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावल्याने किंवा ते दान केल्याने घरात असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीचे दान शनि आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. त्याच वेळी, शनि आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या प्रभावांना शांत करण्याचे सामर्थ्य हनुमानाकडे आहे. अशा परिस्थितीत हनुमान जयंतीच्या दिवशी तुळशीचे दान केल्याने शनि आणि मंगळ ग्रहाचे आशीर्वाद मिळतात.

हनुमान जयंतीच्या दिवशी तुळशीचे दान केल्याने शनि दोष, मंगळ दोष आणि राहू-केतूचे नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते. विशेषत: ज्या लोकांच्या कुंडलीत मांगलिक दोष आहे किंवा शनी साडेसाती किंवा धैय्यामधून जात आहेत त्यांनी हनुमान जयंतीला तुळशीचे दान करावे.

Hanuman Jayanti 2025: पहिल्यांदा सूर्यनमस्कार कोणी आणि कधी घातला? जाणून घ्या लोककथा!

 

Web Title: Hanuman Jayanti 2025: Bring and donate a Tulsi plant on Hanuman Jayanti to avoid the unrest of Rahu-Ketu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.