Vinayak Chaturthi May 2025: मराठी वर्षातील दुसरा वैशाख महिना सुरू झाला आहे. या वैशाख महिन्यात विविध प्रकारची व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जातात. मे महिन्याची सुरुवातही होत आहे. प्रथमेश असलेल्या गणपती बाप्पाच्या शुभाशिर्वादाने महिन्याला प्रारंभ होत आहे. गुरुवार, ०१ मे २०२५ रोजी वैशाख विनायक चतुर्थी आहे. गुरुवारी विनायक चतुर्थीला गणपती बाप्पाचे पूजन करण्यासह स्वामींची सेवा केल्यास गणेशासह स्वामीही कृपा करतील, असे म्हटले जाते.
प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे. गुरुवार हा स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरु यांच्या पूजनाचा दिवस मानला जातो. हजारो भाविक या दिवशी स्वामींच्या मठात जातात. स्वामींचे पूजन करतात. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी बाप्पा आणि स्वामी महाराज यांचे शुभाशिर्वाद प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे. या दिवशी गणेशाचे अत्यंत प्रभावी मानले गेलेले एक स्तोत्र अवश्य म्हणावे. स्तोत्र मनोभावे म्हटले असता सहा मासात या स्तोत्राची अनुभूती येऊ लागेल आणि वर्षभरात निश्चित फळ मिळेल असा दावा या स्तोत्राचे रचेते महर्षी नारद करतात. यासह स्वामींचा अत्यंत प्रभावी मानला गेलेला मंत्र म्हणणे अतिशय शुभ, पुण्याचे आणि लाभदायी मानले जाते. गणपती स्तोत्र आणि स्वामींचा मंत्र म्हणायला प्रत्येकी ५ मिनिटांचा कालावधी पुरेसा आहे. त्यामुळे हे अवश्य म्हणावे आणि कृपेचे धनी व्हावे, असे म्हटले जाते.
गणपती संकट नाशनम स्तोत्र
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका | भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | तीसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||
पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव तें | सातवे विघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||
नववे श्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक | अकरावे गणपति बारावे श्रीगजानन ||४||
देवनावे अशी बारा तीनसंध्या म्हणे नर | विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||
विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | पुत्रर्थ्याला मिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||
जपता गणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ| एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||
स्वामींचा अत्यंत प्रभावी तारक मंत्र
निःशंक हो, निर्भय हो, मना रेप्रचंड स्वामीबळ पाठीशी रेअतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामीअशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
जिथे स्वामी पाय तिथे न्यून कायस्वये भक्त प्रारब्ध घडवी ही मायआज्ञेविणा काळ ना नेई त्यालापरलोकही ना भिती तयाला ।।२।।
उगाची भीतोसी भय पळू देजवळी उभी स्वामी शक्ती कळू देजगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचानको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।
खरा होई जागा तू श्रद्धेसहितकसा होशी त्यावीण तू स्वामीभक्तकितीदा दिला बोल त्यांनीच हातनको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थस्वमीच या पंच प्राणाभृतातहे तिर्थ घे, आठवी रे प्रचितीन सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।
।। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।
।। श्री स्वामी समर्थ ।।