शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारी माघ संकष्ट चतुर्थी २०२६: ५ उपाय करा, २ मंत्र ‘तारक’ ठरतील; गणपती-स्वामी शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:43 IST

Guruwar Magh Sankashti Chaturthi February 2026: अगदी ५ ते १० मिनिटांत होणारे काही उपाय करून स्तोत्र-मंत्र पठण केले, तर गणपती बाप्पा, स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

Guruwar Magh Sankashti Chaturthi February 2026: गुरुवार, ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. माघ महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला गेला आहे. गुरुवारी संकष्ट चतुर्थी आल्याने याचे महत्त्व वाढल्याचे म्हटले जात आहे. गुरुवारी दत्तगुरू, स्वामी समर्थ यांची उपासना, आराधना केली जाते. त्यामुळे अगदी ५ ते १० मिनिटांत होणारे काही उपाय करून स्तोत्र-मंत्र पठण केले, तर गणपती बाप्पा, स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. जाऊन घेऊया...

लक्ष्मी नारायण योगात माघ संकष्ट चतुर्थी २०२६: १० राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा-लाभ; शुभं भवतू!

प्रथमेश गणपती हा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणार आहे. गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत. सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गुरुवार हा स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरु यांच्या पूजनाचा दिवस मानला जातो. हजारो भाविक या दिवशी स्वामींच्या मठात जातात. स्वामींचे पूजन करतात. बाप्पा आणि स्वामी महाराज यांचे शुभाशिर्वाद प्राप्त करण्याची सुवर्ण संधी आहे. गुरुवारी आलेल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती आणि स्वामी यांच्याशी संबंधित नेमके कोणते उपाय करावेत, ते पाहुया...

५ उपाय करा, गणपती-स्वामी शुभ करतील!

- शक्य असेल तर सकाळी गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन अवश्य घ्यावे. 

- शक्य असेल तर संकष्ट चतुर्थी व्रताचरण करावे. २१ वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन अर्घ्य द्यावे.

- हे करणे शक्य नसेल तर सकाळी शुचिर्भूत आल्यावर गणपती बाप्पाला न विसरता दुर्वा, जास्वंदाचे फूल वाहावे. मोदक किंवा लाडू अर्पण करावे.

- गुरुवारी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. 

- स्वामींचे पूजन करताना पिवळे फूल, पिवळ्या रंगाची मिठाई आवर्जून अर्पण करा. 

माघ संकष्ट चतुर्थी २०२६: कसे करावे गणेश पूजन? पाहा, शुभ मुहूर्त, मान्यता अन् चंद्रोदयाची वेळ

गणपती संकट नाशनम स्तोत्र

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका | भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ॥१॥

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें | तीसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ॥२॥

पाचवे श्रीलंबोदर सहावे विकट नाव तें | सातवे विघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ॥३॥

नववे श्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक | अकरावे गणपति बारावे श्रीगजानन ॥४॥

देवनावे अशी बारा तीनसंध्या म्हणे नर | विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ॥५॥

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन | पुत्रर्थ्याला मिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ॥६॥

जपता गणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ| एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ॥७॥

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे | श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ॥८॥

स्वामींचा अत्यंत प्रभावी तारक मंत्र

निःशंक हो, निर्भय हो, मना रेप्रचंड स्वामीबळ पाठीशी रेअतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामीअशक्यही शक्य करतील स्वामी ॥१॥

जिथे स्वामी पाय तिथे न्यून कायस्वये भक्त प्रारब्ध घडवी ही मायआज्ञेविणा काळ ना नेई त्यालापरलोकही ना भीती तयाला ॥२॥

उगाची भीतोसी भय पळू देजवळी उभी स्वामी शक्ती कळू देजगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचानको घाबरु तू असे बाळ त्यांचा ॥३॥

खरा होई जागा तू श्रद्धेसहितकसा होशी त्यावीण तू स्वामीभक्तकितीदा दिला बोल त्यांनीच हातनको डगमगू स्वामी देतील साथ ॥४॥

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थस्वमीच या पंच प्राणाभृतातहे तीर्थ घेई, आठवी रे प्रचितीन सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥५॥

संकष्ट चतुर्थी २०२६: तिजोरी कधीच रिकामी होणार नाही; संकष्टीला बाप्पाला अर्पण करा 'या' गोष्टी!

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

॥ श्री स्वामी समर्थ ॥

English
हिंदी सारांश
Web Title : Magh Sankashti Chaturthi 2026: Auspicious Rituals, Mantras for Ganesha and Swami Blessings

Web Summary : In February 2026, observe Magh Sankashti Chaturthi with specific rituals and mantras dedicated to Lord Ganesha and Swami Samarth. Performing these simple acts and reciting sacred verses can invoke blessings for well-being and prosperity. Visit temples, offer prayers, and chant mantras for divine grace.
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकganpatiगणपती 2025shree swami samarthश्री स्वामी समर्थSiddhivinayak Ganapati Templeसिद्धिविनायक गणपती मंदिर