गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:56 IST2025-07-23T11:55:35+5:302025-07-23T11:56:12+5:30

Gurupushyamrut Yoga July 2025: गुरुपुष्यामृत योगात अगदी १० मिनिटांत होणारे, मराठीत असलेले अत्यंत प्रभावी स्तोत्र म्हणा आणि सद्गुरू सेवेचे पुण्यफल मिळवा. जाणून घ्या...

gurupushyamrut yoga july 2025 is sadguru seva not possible recite most impactful guru bavani stotra marathi and attain complete virtue | गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा

गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा

Gurupushyamrut Yoga July 2025: गुरुपुष्यामृतयोग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृतयोग असतो. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे. चातुर्मासातील पहिला गुरुपुष्यामृत योग जुलै महिन्यात जुळून आलेला आहे. महाराष्ट्रात शुक्रवार, २५ जुलै २०२५ रोजी श्रावणारंभ होणार आहे. अनेकार्थाने श्रावण महिना महत्त्वाचा मानला गेला आहे. गुरुवार हा दिवस सद्गुरुंची सेवा, पूजन करण्याचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी दत्तगुरू, स्वामींची विशेष सेवा केली जाते. आजच्या धकाधकीच्या जीवनात मनात इच्छा असूनही सद्गुरू सेवा करता येत नाही, यावर उपाय म्हणजे अगदी १० मिनिटांत होणारे अत्यंत प्रभावी मराठीतील स्तोत्र म्हणा. 

गुरुवारी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगात दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा, असे केल्याने दत्तगुरूंचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. दत्तगुरुंशी संबंधित अनेक स्तोत्र, मंत्र, श्लोक आहेत. पैकी एक म्हणजे दत्तबावनी किंवा दत्तबावन्नी. दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र. 

गुरुपुष्यामृतयोगावर दत्तबावनी स्तोत्र म्हणा, अमृत पुण्य कमवा

दत्तबावन्नी स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. मूळ दत्तबावनी गुजराती आहे. हे स्तोत्र मराठीत उपलब्ध असून, पठण करण्यास सहज, सुलभ असेच आहे. श्रीगुरुचरित्र, श्रीदत्त पुराण, श्रीदत्त महात्म्य, श्रीपाद चरित्रामृत ह्या सगळ्या ग्रंथांचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्त बावन्नी हे स्तोत्र आहे. गुरुपुष्यामृत योगावर याचे पठण करणे अतिशय शुभ पुण्यकारक मानले जाते. पठण शक्य नसेल, तर मनोभावे श्रवण करावे, असे म्हटले जाते.

श्री दत्त बावन्नी मराठीत

जय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥

अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥

ब्रह्माऽच्युतशंकर अवतार । शरणांगतासि तूं आधार ॥ ३॥

अंतर्यामी ब्रह्यस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥

काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥

कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥

आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥ ७॥

ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥ ८॥

दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥

केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब ।  । १०॥

विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥

जंभे देवा त्रासविले । कृपामृते त्वां हांसविलें ॥ १२॥

पसरी माया दितिसुत मूर्त । इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥ १३॥

ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥

घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥

बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥

ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद  ॥ १७॥

धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥

पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥

स्मर्तृगामी कलितार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥

पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥

सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥

वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥ २३॥

वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें । फळली झाली गृहरत्नें ॥ २४॥

निरसुनि विप्रतनूचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥

दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥

घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥ २७॥

ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥ २८॥

पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥

अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३०॥

तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥

एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला अससी, पुन्हां अरूप ॥ ३२॥

तोषविले निज भक्त सुजात । दाखवुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥

हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥

राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥

शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥

अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥ ३७॥

आधि-व्याधि-उपाधि-गर्व । टळती भावें भजतां सर्व ॥ ३८॥

मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥

डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥ ४०॥

पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥ ४१॥

करुनि धूप गाइल नेमें । दत्तवावनी जो प्रेमें ॥ ४२॥

साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥

राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥

नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥ ४५॥

यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥

अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥

सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥

वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥

थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥

अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसता खाइल मार ॥ ५१॥

तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

Web Title: gurupushyamrut yoga july 2025 is sadguru seva not possible recite most impactful guru bavani stotra marathi and attain complete virtue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.