शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडवा विशेष: आपल्या देशाच्याच नव्हे, तर जगाच्या सुख-समृद्धीसाठी करूया 'ही' दिव्य उपासना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 07:00 IST

Gudi Padwa 2026: यंदा गुढीपाडव्याला एक मुखाने, एक दिलाने म्हणूया 'वसुधैव कुटुंबकमचा मंत्र देणारी ही विशेष प्रार्थना!

आज गुढीपाडवा(Gudi Padwa 2026) आजपासून हिंदू नवीन वर्षाचा आरंभ होत आहे. या निमित्ताने 'सर्वेपि सुखिनः संतु' हा विचार बाळगून आपणही देवाकडे प्रार्थना करूया. ही प्रार्थना सर्वांना मुखोद्गत असेलच, ती प्रार्थना म्हणजे मंत्रपुष्पांजली.

Gudi Padwa 2026: अनेक प्रयत्न करूनही घरात पाळणा हलत नसेल, तर गुढीपाडव्यापासून करा 'हे' व्रत!

गणेशोत्सवात आरती संपल्यावर कानावर पडून पडून पाठ झालेली मंत्रपुष्पांजली हा आपल्या थोर ऋषीमुनींनी लिहिलेला सिद्धमंत्र आहे. त्याचे नीट उच्चारण केले आणि श्रद्धापूर्वक ते नित्यनेमाने म्हटले, तर अखिल विश्वाचा उद्धार करण्याची ताकद त्या मंत्रात आहे. त्यात केवळ आपल्या राज्याचा, जिल्ह्याचा, देशाच्या सुख समृद्धीचा विचार केलेला नाही, तर अखिल विश्वाच्या शांततेसाठी प्रार्थना केली आहे. चला तर, आजच्या शुभ मुहूर्तावर एक मुखाने एक दिलाने आपणही अर्थ समजून घेत मंत्र पुष्पांजली म्हणूया....

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्|ते हं नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महेस मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु|कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम: ॐ स्वस्तिसाम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळितितदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहेआविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इतिएकदंतायविद्महे वक्रंतुडाय धीमहितन्नोदंती प्रचोदयात्श्रीशुभं भवतु

मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत. प्रत्येक श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे:-

यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन् तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देवा:

अर्थ – देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.

Gudi Padwa 2026: नववर्षाच्या स्वागताला दारी रेखाटा स्वस्तिक आणि आकर्षित करा अनंत ऐश्वर्य!

ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः।

अर्थ – आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची )पूर्ति प्रदान करो.

ओम स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।

अर्थ – आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.

समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात्। पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति।

अर्थ – आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.

Vastu Shastra: नव्या वर्षात घराची होईल भरभराट; चैत्रांगणातील ३३ प्रतीकांचे महत्त्व आणि वास्तुशास्त्रातील स्थान!

तदप्येषः श्लोकोभिगीतो। मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।।

अर्थ – या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gudi Padwa: Pray for global peace, prosperity with 'this' divine worship.

Web Summary : On Gudi Padwa, the Hindu New Year, let's pray for global well-being by reciting the Mantrapushpanjali. This powerful mantra, passed down by sages, seeks peace and prosperity for the entire universe, not just our own region. Understanding its meaning enhances its impact.
टॅग्स :Gudi Padwaगुढीपाडवा 2026gudhi padwaगुढीपाडवाIndian Festivalsभारतीय उत्सव-सणspiritualअध्यात्मिक