Gudi Padwa 2026: गुढीचा रंग बदलणार तुमचं भाग्य! जाणून घ्या कोणत्या रंगाचे वस्त्र घरामध्ये आणेल सकारात्मक ऊर्जा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 10:05 IST2026-03-12T10:04:06+5:302026-03-12T10:05:56+5:30
Gudi Padwa 2026: गुढी अर्थात ध्वज, तोही विजयाचा! हिंदू नववर्षाच्या सुरूवातीला हा विजयध्वज घरावर उभरताना कोणते वस्त्र त्याची ऊर्जा वाढ्वेल ते जाणून घेऊ.

Gudi Padwa 2026: गुढीचा रंग बदलणार तुमचं भाग्य! जाणून घ्या कोणत्या रंगाचे वस्त्र घरामध्ये आणेल सकारात्मक ऊर्जा
हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा(Gudi Padwa 2026) या दिवशी आपण घराबाहेर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारतो. गुढी केवळ एक धार्मिक विधी नसून ती समृद्धी, आरोग्य आणि विजयाचे प्रतीक आहे. यंदाच्या गुढीपाडव्यासाठी गुढीचे वस्त्र, पूजेच्या विधीबद्दल सविस्तर माहिती आणि मुहूर्त सविस्तर माहिती दिली आहे.
Gudi Padwa 2026 Date: गुढीपाडवा कधी? १८ की १९ मार्च? गुढी उभारण्याचा अचूक मुहूर्त एका क्लिकवर!
गुढीसाठी कोणत्या रंगाचे वस्त्र शुभ ठरेल?
शास्त्रात गुढीसाठी विशिष्ट रंगांचे महत्त्व सांगितले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खालीलपैकी एका रंगाची निवड करू शकता:
केशरी किंवा भगवा (Saffron): हा रंग पावित्र्य, त्याग आणि उर्जेचे प्रतीक आहे. गुढीसाठी हा सर्वात पारंपरिक आणि शुभ रंग मानला जातो.
पिवळा (Yellow): पिवळा रंग आनंद, समृद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र उत्तम ठरते.
लाल (Red): लाल रंग शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. नवीन कार्याची सुरुवात करताना हा रंग अतिशय शुभ मानला जातो.
गडद हिरवा (Dark Green): हिरवा रंग निसर्ग आणि चैतन्याचा रंग आहे. नवीन पालवी फुटण्याच्या काळात हिरव्या रंगाचे वस्त्र प्रगतीचे दर्शन घडवते.
टीप: शक्यतो पांढरा किंवा काळा रंग गुढीसाठी वापरणे टाळावे. जरी पांढरा रंग शांततेचा असला, तरी गुढी हे 'विजयाचे' प्रतीक असल्याने तेजस्वी रंग अधिक श्रेयस्कर ठरतात.
गुढी उभारण्याची विधिवत पद्धत
गुढी उभारताना ती सूर्योदयानंतर लगेच उभारणे सर्वोत्तम मानले जाते. यावर्षी तिथींच्या क्षयामुळे तारखेबाबत थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही क्षय तिथी असली, तरी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. यावर्षी गुढीपाडवा १९ मार्च २०२६, गुरुवार रोजी साजरा केला जाणार आहे. १८ मार्चला फाल्गुन अमावस्या असून तिची समाप्ती १९ मार्चच्या सकाळी होत आहे. त्यामुळे शास्त्रानुसार १९ मार्च हाच दिवस नूतन वर्षारंभासाठी योग्य ठरवण्यात आला आहे.
Gudi Padwa 2026: गुढी पाडव्याला नवीन गाडी घेताय? थांबा! वाहन खरेदीचा 'हा' मुहूर्त ठरेल अधिक लाभदायी!
गुढी उभारण्याचा मुहूर्त:
१९ मार्च रोजी सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा 'क्षय' आहे. याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी अमावस्या समाप्त होईल. त्यानंतर, अर्थात सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनंतर कधीही तुम्ही गुढी उभारू शकता.
गुढीची तयारी :
एक उंच बांबूची काठी (स्वच्छ धुतलेली).
रेशमी किंवा भरजरी नवीन वस्त्र.
कडुलिंबाची डहाळी आणि आंब्याची पाने.
फुलांचा हार (गाठीसह - साखरेच्या माळा).
तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या (कलश).
२. मांडणी:
बांबूच्या वरच्या टोकाला नाडी, दोरी किंवा सुतळीने रेशमी वस्त्र बांधा.
त्यावर कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आणि फुलांचा हार बांधा.
तांब्यावर चंदनाचे किंवा कुंकवाचे 'स्वस्तिक' काढा आणि तो तांब्या बांबूच्या टोकावर पालथा घाला.
भीमसेनी कापूर: अस्सल भीमसेनी कापूर का आहे श्रेष्ठ? जाणून घ्या त्याची शुद्धता ओळखण्याची सोपी पद्धत
३. गुढी उभारणे:
घराच्या प्रवेशद्वारापाशी किंवा खिडकीत जिथे सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी जागा स्वच्छ करून रांगोळी काढा.
गुढीला पाटावर किंवा उंच जागी नीट स्थिर करा. गुढीचा कलश आकाशाच्या दिशेने असावा.
पूजन आणि नैवेद्य
पूजा: गुढी उभारल्यावर तिला हळद-कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत. धूप-दीप ओवाळून नमस्कार करावा.
नैवेद्य: गुढीला गुळ-खोबऱ्याचा किंवा श्रीखंड-पुरीचा नैवेद्य दाखवावा.
प्रसाद (कडुलिंबाचे महत्त्व): पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने, गूळ, जिरे, ओवा आणि मीठ एकत्र करून त्याचे सेवन करावे. हे मिश्रण आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.
सामुद्रिक शास्त्र: तुमच्या दातांमध्ये फट आहे का? अभिनंदन! तुम्ही आहात 'या' बाबतीत प्रचंड नशीबवान!
