शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Gita Jayanti 2024: यंदाच्या गीता जयंतीला अद्भूत शुभ योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 13:34 IST

Gita Jayanti 2024: गीता जयंती देशभरात साजरी गेली जाते. या दिवशी श्रीकृष्णाचे विशेष पूजन, स्मरण केले जाते. जाणून घ्या...

Gita Jayanti 2024: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥... मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. याच दिवशी गीता जयंती असते. गीता जयंतीचा उत्सव अगदी देशभर साजरा केला जातो. या दिवशी भगवद्गीतेचे पठण केले जाते. बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग याची आदर्श शिकवण देणाऱ्या श्रीकृष्णाचे स्मरण केले जाते. 

मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद मिळतात. मार्गशीर्ष एकादशीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते. तेव्हापासून या दिवशी गीता जयंती साजरी केली जाऊ लागली. गीता जयंतीच्या दिवशी भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. गीता जयंतीला गीता पठण केल्याने जीवनात सुख-शांती येते, असे मानले जाते. भगवद्‌गीतेचे १८ अध्याय, ७०० श्लोक आहेत.

गीता जयंती कधी आहे?

गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी ११ डिसेंबर २०२४ रोजी आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी ११ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ०३ वाजून ४२ मिनिटांनी सुरू होईल आणि १२ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री ०१ वाजून ०९ मिनिटांनी समाप्त होत आहे. गीता जयंतीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी रवि आणि भाद्रावस योग तयार होणार आहेत. या शुभ योगांमध्ये भगवान विष्णूची उपासना केल्याने भक्तांना शाश्वत फळ मिळते आणि त्यांच्या जीवनातील सर्व दुःखे दूर होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

गीता हा धर्मज्ञानाचा कोष

 प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा नान मिळाला आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. 

कालातीत गीता

वेदान्ताची उपनिषदे, भगवद्‌गीता आणि ब्रह्मसूत्रे ही प्रस्थानत्रयी मानली आहे. म्हणून केवलाद्वैतवादी शंकराचार्य आणि त्यांचे अनुयायी, विशिष्टाद्वैतवादी रामानुजाचार्य, त्यांचे गुरु यामुनाचार्य आणि त्यांचे अनुयायी , द्वैतवादी मध्वाचार्यं आणि त्यांचे अनुयायी यांची आणि वल्लभाचार्य यांसह अनेक आचार्यांनी गीतेवर भाष्ये आणि टीका लिहिली आहेत. भारतातील अनेक भाषांमध्ये गीतेची भांषातरे, भाष्य वा टीका वा अनुवाद झाला आहे. गेल्या हजार-बाराशेच्या वर्षाच्या काळामध्ये हे निर्माण झालेले आहेत. गीतेच्या अगणित पोथ्या छापखाना येण्यापूर्वी लिहिल्या जात होत्या. भगवद्‌गीतेची आजवर उपलब्ध असलेली सर्वांत प्राचीन व अधिकृत प्रत म्हणजे शंकराचार्यांचे गीताभाष्य ही होय. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते अगदी लोकमान्य टिळक यांच्यापर्यंत अनेकांनी गीतेवर भाष्य केले आहे. आजच्या काळातही गीतेवर अभ्यास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गीतेतून सातत्याने नवीन काहीतरी मिळत असल्यामुळे याची कालातीतता स्पष्ट होते.

 

टॅग्स :ekadashiएकादशीspiritualअध्यात्मिक