शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Ganesh festival 2022: बाप्पाने आपल्या चुका पदरात घेऊन मोठ्या मनाने घरी यावं म्हणून 'अशी' करा त्याची प्रार्थना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 09:33 IST

Ganesh festival 2022: घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी एव्हाना अंतिम टप्प्यात असेल. पण आपल्यावर कोणताही राग न ठेवता बाप्पाने आपल्या घरी यावे म्हणून त्याची मनधरणीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे ना...!

बाप्पाचे आगमन म्हणजे सगळा आनंदाचा माहोल. मात्र आपल्या मनात काही गोष्टी सलत असतील तर आनंदात विरजण पडते. उत्सवाचा आनंद घेता येत नाही आणि एखाद्या चुकीसाठी बाप्पाही शिक्षा करेल ही मनात भीती राहते. यासाठी मनाचा गाभाराही स्वच्छ करणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी ही प्रार्थना!

आपल्या हातून पुण्य एकवेळ होणार नाही, पण दिवसभरात पापं अगणित होत असतात. आपण साधे श्वसन करतो, तेव्हा आपल्या श्वसन मार्गावाटे कितीतरी सूक्ष्म जीव जीवाणूंना त्रास होतो. आपल्या हातून कळत नकळत किडा मुंगी मारले जातात. चालता बोलता पायाखाली सूक्ष्म जीव मारले जातात. शिवाय आपल्याला अडथळा होणाऱ्या प्राण्यांचा कीटकांचा आपण खात्मा करतो, तो भाग वेगळा. यापलीकडे आपल्या बोलण्यातून, कृतीतून कितीतरी जण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दुखावले जातात. जाणून बुजून आपण ज्यांना दुखावतो, त्रास देतो ही त्यात आणखी एक भर. अशी जर रोजची यादी करायची ठरवली, तर आपल्या पापांचा घडा नुसता भरणार नाही, तर ओसंडून वाहील. जितकी पापं कळत नकळत पणे होतात, त्या पापांचे परिमार्जन व्हावे, घडा रिकामा व्हावा आणि तो आपल्या सत्कर्माने, पुण्याने भरावा, यासाठी आपल्याला बालपणी छान प्रार्थना शिकवली होती. तिचाच पुनर्वापर करावा. 

मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानु कोटी,मोरेश्वरा बा तू घाल पोटी।।

हे गणराया, आमच्या कडून रोजच्या रोज कोट्यानुकोटी अपराध घडत आहेत. त्यांची संख्या कमी व्हायची सोडून वाढतच आहे. तसे झाले, तर आमच्या वाट्याला येणारे भोग सहन करता करता आमचे आयुष्य खर्च होईल. म्हणून तू मोठ्या मनाने, मोठ्या दिलाने आमचे अनंत अपराध तुझ्या पोटात घाल. आमच्या कर्माचा घडा रिता झाला, की आम्ही पुन्हा चांगल्या कार्याचा श्रीगणेशा करण्याचे तुला वचन देतो. 

प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरोनि बुद्धी मती दे, आराध्य मोरेश्वरा,चिंता क्लेश दरिद्र दुख  अवघे, देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा, भक्ता बहु तोषवी।।

हे गणनायका, गजमुखा, बा हेरंबा, आमच्या हातून सत्कार्य घडावे म्हणून तुझ्या नावाने प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ करतो. बुद्धी आम्हा सर्वांकडे आहेच, पण तिचा यथायोग्य वापर तू करून घे. साऱ्या विश्वाची चिंता, क्लेश, दारिद्र, दुःख तू दूर कर आणि सर्वांना सुखात, आनंदात ठेव. हे दान आमच्या पदरात टाकून आम्हाला संतुष्ट कर. 

इतक्या तन्मयतेने प्रत्येकाने आपल्या पापांची कबुली दिली आणि चांगले वागण्याची हमी दिली, तर बाप्पा आपली हाक का बरे ऐकणार नाही? गणपती बाप्पा मोरया!!!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanpati Festivalगणेशोत्सव