Shree Gajanan Maharaj Prakat Din 2026: गण गण गणात बोते... गण गण गणात बोते... माघ शुद्ध सप्तमीला शेगाव येथे संत श्री गजानन महाराज प्रकट झाले. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात. महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशातील असंख्य भक्तगणांचे गजानन महाराज श्रद्धास्थान आहेत. गजानन महाराज प्रकट दिनी लाखो भाविक शेगाव येथे जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेतात. आपापल्यापरिने गजानन महाराजांची सेवा करतात. ‘श्री गजानन विजय’ हा अतिशय पवित्र ग्रंथ असून, महाराजांच्या प्रकट दिनी याचे पारायण करता येऊ शकते. जाणून घेऊया...
यंदा रविवार, ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गजानन महाराज प्रकट दिन आहे. संत श्री दासगणू महाराज विरचित "श्री गजानन विजय ग्रंथ" हे गजानन महाराजांचे ओवीबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. या ग्रंथांतील ओव्यामध्ये गजानन महाराजांची महती, आध्यात्मिक तत्त्वज्ञान, जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहे. काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात. आणि जीवनाचे रहस्य जणू अलगद उलगडून टाकतात. भक्तगण या ग्रंथाचे नित्यनेमाने पारायण, वाचन करतात. एका दिवसांत श्री गजानन विजय ग्रंथ पारायण करता येऊ शकते.
‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण अवश्य करा
श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य “श्री गजाननविजय ग्रंथ” वाचनात आहे. श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्य शाली ग्रंथ आहे. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन अन् एकदा तरी पारायण करा श्री गजाननविजय ग्रंथाचे, असे म्हटले जाते. संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्ट फळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे. श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्म्य वेगळे आहे. जीवनातील विविध समस्या, अडचणींवर श्री गजानन विजय हा ग्रंथ रामबाण उपाय मानला गेल्याचे सांगितले जाते.
- एकआसनी पारायण: एका दिवसात एकाच बैठकीत (न उठता) संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करणे. ही पारायणाची अत्यंत उत्तम पद्धती आहे. वाचन गतीनुसार पारायणासाठी ४ ते ५ तास लागतात. गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्त्व संत कवी दासगणू महाराजांनी सांगितले आहे.
- एक दिवसीय पारायण: एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार २१ अध्यायाचे पारायण करता येू शकते. आजच्या धकाधकीच्या काळात एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्तमंडळी पारायण करतात. ते एकदिवसीय पारायण. जागतिक पारायण दिनाला वरील दोनपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे. वेळेचे बंधन व व्यस्त जीवनप्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धतीचा वापर आपण करतो.
॥ श्री गजानन जय गजानन ॥
॥ गण गण गणात बोते ॥
Web Summary : On Gajanan Maharaj Prakat Din, devotees read ‘Shri Gajanan Vijay’ for blessings. The holy book contains spiritual essence. Reciting it can solve life problems. It can be done in one sitting or throughout the day, as per convenience. Devotees believe it fulfills wishes.
Web Summary : गजानन महाराज प्रकट दिन पर, भक्त 'श्री गजानन विजय' आशीर्वाद पाने के लिए पढ़ते हैं। पवित्र पुस्तक में आध्यात्मिक सार है। इसका पाठ करने से जीवन की समस्याएं हल हो सकती हैं। यह एक बैठक में या पूरे दिन, सुविधा के अनुसार किया जा सकता है। भक्तों का मानना है कि यह इच्छाओं को पूरा करता है।