Shanivari Falgun Vinayak Chaturthi February 2026: शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी विनायक चतुर्थी आहे. मराठी वर्षातील शेवटचा फाल्गुन मास सुरू झाला आहे. फाल्गुन मासात विविध सण, व्रते केली जातात. याच फाल्गुन महिन्यातील शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत आहे. गणेश व्रतांमध्ये विनायक चतुर्थीचे व्रत शुभ पुण्य फलदायक मानले गेले आहे. शनिवारी विनायक चतुर्थी आल्यामुळे साडेसाती आणि अडीचकीचा प्रभाव असणाऱ्यांनी आवर्जून काही उपाय करावेत, असे म्हटले जाते. हे उपाय केल्यास गणपती आणि शनि या दोघांची कालातीत कृपा लाभू शकते, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...
गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत आवर्जून केले जाते. गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. शनिवार या दिवसावर शनि ग्रहाचा अंमल असतो, असे म्हटले जाते. ज्या राशींची शनि साडेसाती किंवा शनिचा ढिय्या प्रभाव आहे, अशा लोकांनी आवर्जून काही उपाय करावेत, असे सांगितले जाते.
साडेसाती सुरू असणाऱ्यांनी ‘हे’ उपाय करा
- शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे.
- विनायक चतुर्थीला गणपतीला एक दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी.
- शक्य असेल तर २१ दुर्वांची जोडी अर्पण करावी.
- दुर्वांसह जास्वंदीचे फूल किंवा लाल फूल वाहावे, लाडू-मोदक अर्पण करावे.
- अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे.
- ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.
- सध्या कुंभ, मीन आणि मेष राशींची साडेसाती सुरू आहे. तसेच सिंह आणि धनु राशींवर शनि ढिय्या प्रभाव सुरू आहे.
- शनिवारी शनिचे विशेष व्रत करावे. शक्य असेल शनि मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.
- शनिवारी सकाळी तसेच प्रदोष काळी, तिन्ही सांजेला दिवे लागणीला शनी देवाचे स्मरण, पूजन करावे.
- साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते.
- शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥
Web Summary : In February 2026, Falgun Vinayak Chaturthi offers remedies for those experiencing Sade Sati. Performing specific rituals dedicated to Lord Ganesha and Lord Shani can bring relief and blessings. These include visiting temples, offering Durva grass, chanting mantras, and worshipping deities like Hanuman, Vishnu, and Mahadev to mitigate negative impacts.
Web Summary : फरवरी 2026 में फाल्गुन विनायक चतुर्थी पर साढ़े साती से प्रभावित लोगों के लिए उपाय हैं। गणेश और शनि देव की विशेष पूजा से राहत और आशीर्वाद मिल सकता है। मंदिरों में दर्शन करें, दूर्वा घास चढ़ाएं, मंत्र जाप करें और हनुमान, विष्णु, महादेव की आराधना करें।